झोपेतून पहाटे 4 ला उठून शेतात गेला अन्‌ उचलले टोकाचे पाऊल!; खामगाव तालुक्‍यातील घटना

खामगाव (भागवत राऊत ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः झोपेतून पहाटे चारला उठून शेतात जात झाडाला गळफास घेऊन युवकाने आत्महत्या केली. ही खळबळजनक घटना आज, 20 एप्रिलला चितोडा (ता. खामगाव) शिवारात घडली. राष्ट्रपाल प्रल्हाद इंगळे (30, रा. चितोडा) असे आत्महत्या केलेल्याचे नाव आहे. आज पहाटे चारच्या सुमारास झोपेतून उठून घरात कोणाला काही न सांगता तो चितोडा …
 

खामगाव (भागवत राऊत ः बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा)  ः झोपेतून पहाटे चारला उठून शेतात जात झाडाला गळफास घेऊन युवकाने आत्‍महत्‍या केली. ही खळबळजनक घटना आज, 20 एप्रिलला चितोडा (ता. खामगाव) शिवारात घडली.

राष्ट्रपाल प्रल्हाद इंगळे (30, रा. चितोडा) असे आत्‍महत्‍या केलेल्याचे नाव आहे.  आज पहाटे चारच्‍या सुमारास झोपेतून उठून घरात कोणाला काही न सांगता तो चितोडा येथील शिवारातील अशोक तुकाराम हिवराळे यांच्या शेतात गेला. तिथे गोंधनाच्या झाडाला नायलॉनच्या दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली. त्‍यांच्‍या आत्‍महत्‍येचे कारण वृत्त लिहिपर्यंत कळू शकले नाही. तपास खामगाव ग्रामीण पोलीस ठाण्याचे एएसआय आनंदा वाघमारे करत आहेत.