झोपेतून उठवून 16 वर्षीय मुलीला पळवले, खामगाव पोलिसांनी केली मुलीची सुटका, तरुणाविरुद्ध लैंगिक अत्याचाराचाही गुन्हा

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः 16 वर्षीय मुलीला फूस लावून पळवून नेत लैंगिक अत्याचार करणाऱ्या 20 वर्षीय तरुणाला खामगाव शहर पोलिसांनी अटक करत युवतीची सुटका केली. श्रावण राजाराम पुरी (रा. चिखली खुर्द, ता. खामगाव) असे आरोपीचे नाव आहे. त्याला आज, 29 मे रोजी न्यायालयात हजर केले असता परवापर्यंत (31 मे) पोलीस कोठडी सुनावण्यात आली. खामगाव …
 

बुलडाणा (बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः 16 वर्षीय मुलीला फूस लावून पळवून नेत लैंगिक अत्याचार करणाऱ्या 20 वर्षीय तरुणाला खामगाव शहर पोलिसांनी अटक करत युवतीची सुटका केली. श्रावण राजाराम पुरी (रा. चिखली खुर्द, ता. खामगाव) असे आरोपीचे नाव आहे. त्याला आज, 29 मे रोजी न्यायालयात हजर केले असता परवापर्यंत (31 मे) पोलीस कोठडी सुनावण्यात आली.

खामगाव शहरातील वाडी येथील पीडित मुलगी घराच्या गच्चीवर झोपलेली असताना 14 मार्चच्या मध्यरात्री श्रावणने तिला फूस लावून पळवून नेले होते. याप्रकरणी खामगाव शहर पोलीस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. खामगाव शहर पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरिक्षक पांडुरंग इंगळे यांच्याकडे प्रकरणाचा तपास देण्यात आला होता. लॉकडाऊन असल्यामुळे आरोपी नेमका कुठे आहे याचा उलगडा होत नव्हता. काल, 28 मे रोजी श्रावण हा अल्पवयीन मुलीसोबत चिखलीत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यावरून खामगाव शहर पोलिसांनी चिखली पोलिसांच्या मदतीने त्‍याला अटक करत अल्पवयीन मुलीची सुटका करून तिला नातेवाइकांच्या ताब्यात दिले.

मुलीची वैद्यकीय तपासणी करून आरोपीविरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला. न्यायालयाच्या आदेशाने आरोपीला 31 मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. प्रकरणाचा तपास खामगाव शहर पोलीस स्टेशनचे ठाणेदार सुनील अंबुलकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरिक्षक पांडुरंग इंगळे करत आहेत.