जुगार अड्ड्यांवर “एलसीबी’चे छापे; चिखली, संग्रामपूर तालुक्‍यात धडाकेबाज कारवाया

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः शेतात सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर छापा मारून 5 जुगाऱ्यांना रंगेहात पकडण्यात आले. ही कारवाई बुलडाणा स्थानिक गुन्हे शाखेच्या (एलसीबी)पथकाने काल, 20 जूनला सायंकाळी रुधाना (ता. संग्रामपूर) येथे केली. यावेळी 1 लाख 13 हजार 495 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. सचिन शिवहरी राऊत (35), विनायक नारायण सपकाळ (40), सय्यद वकील …
 

बुलडाणा (बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः शेतात सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर छापा मारून 5 जुगाऱ्यांना रंगेहात पकडण्यात आले. ही कारवाई बुलडाणा स्थानिक गुन्हे शाखेच्या (एलसीबी)पथकाने काल, 20 जूनला सायंकाळी रुधाना (ता. संग्रामपूर) येथे केली. यावेळी 1 लाख 13 हजार 495 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. सचिन शिवहरी राऊत (35), विनायक नारायण सपकाळ (40), सय्यद वकील सय्यद अयुब (28, तिघे रा. रुधाना, ता संग्रामपूर), गौतम शंकर गव्हांदे(37), उमेश लक्ष्मण टाकसाळ (34, दोघे रा. वकाणा, ता. संग्रामपूर) अशी ताब्‍यात घेतलेल्यांची नावे आहेत.

चिखली तालुक्यातही कारवाई
शेलूद (ता. चिखली) येथील जुगार अड्ड्यावर एलसीबीने आज, 21 जूनला छापा मारून 6 जुगाऱ्यांना अटक केली. त्यांच्याकडून 1 लाख 9 हजार 550 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. चिखली शहराला लागून असलेल्या शेलूद शेतशिवारात जुगार रंगल्याची माहिती एलसीबीला मिळाली होती. मिळालेल्या माहितीच्या आधारे एलसीबीने आज सायंकाळी 4 च्‍या सुमारास छापा मारला.

यावेळी मंगेश वासुदेव इंगळे(25), योगेश नारायण हजारी(28), विकास ज्ञानेश्वर इंगळे(33), संतोष तेजराव कळसकर(37), जितेंद्र ज्ञानेश्वर इंगळे(40), विशाल गजानन इंगळे (28, सर्व रा. शेलूद यांना अटक करत चिखली पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. या दोन्‍ही धडाकेबाज कारवाया कर्तव्यदक्ष जिल्हा पोलीस अधीक्षक अरविंद चावरिया, अप्पर पोलीस अधीक्षक हेमराजसिंह राजपूत (खामगाव), अप्पर पोलीस अधीक्षक बजरंग बनसोडे (बुलडाणा) यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक बळीराम गीते यांच्या आदेशाने एलसीबीचे पोलीस उपनिरीक्षक श्रीकांत जिंदमवार, पोलीस उपनिरीक्षक नीलेश शेळके, पोहेकाँ साजिद शेख, श्रीकृष्ण चांदूरकर, गजानन गोरले, चालक बोर्डे यांनी केल्या.