जिल्ह्यातून गायब होण्याचे सत्र कायम; मायलेकी, दोन तरुणी घरातून निघून गेल्या…

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः मायलेकी गायब झाल्याची घटना सुलतानपूर (ता. देऊळगाव राजा) येथे समोर आली आहे. दोघी हरवल्याची नोंद देऊळगाव राजा पोलीस ठाण्यात काल, ३ जूनला करण्यात आली. अनिता संजय गायकवाड ही ३० वर्षीय विवाहिता आपल्या ९ वर्षीय मुलगी कुमारी संजय गायकवाड हिला घेऊन बेपत्ता झाली आहे. याशिवाय गवंडाळा (ता. खामगाव) ही २५ वर्षीय …
 

बुलडाणा (बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः मायलेकी गायब झाल्याची घटना सुलतानपूर (ता. देऊळगाव राजा) येथे समोर आली आहे. दोघी हरवल्याची नोंद देऊळगाव राजा पोलीस ठाण्यात काल, ३ जूनला करण्यात आली. अनिता संजय गायकवाड ही ३० वर्षीय विवाहिता आपल्या ९ वर्षीय मुलगी कुमारी संजय गायकवाड हिला घेऊन बेपत्ता झाली आहे. याशिवाय गवंडाळा (ता. खामगाव) ही २५ वर्षीय विवाहिता घरातून निघून गेली आहे. ती हरवल्याची तक्रार हिवरखेड पोलीस ठाण्यात नोंद झाली आहे. सावखेड तेजन (ता. सिंदखेड राजा) येथूनही २५ वर्षीय तरुणी बेपत्ता झाली आहे. ती घरातून निघून गेल्याची तक्रार सिंदखेड राजा पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे.