छोटा चोर कसला…निघाला दरोडखोर!; देऊळगाव महीत अटक, खाक्‍या दाखवताच अनेक गुन्‍हे कबूल!

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः चिखली तालुक्यातील साकेगाव येथील घरफोडी व मारहाण प्रकरणातील एका आरोपीला उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांच्या पथकाने 25 फेब्रुवारीला देऊळगाव मही येथून अटक केली होती. गणेश निम्मन खुटन (35, रा. वाकी, ता. देऊळगाव राजा) असे या आरोपीचे नाव आहे. त्याला काल, 26 फेब्रुवारीला न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने 1 दिवसाची पोलीस कोठडी सुनावली. …
 

बुलडाणा (बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः चिखली तालुक्यातील साकेगाव येथील घरफोडी व मारहाण प्रकरणातील एका आरोपीला उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांच्या पथकाने 25 फेब्रुवारीला देऊळगाव मही येथून अटक केली होती. गणेश निम्मन खुटन (35, रा. वाकी, ता. देऊळगाव राजा) असे या आरोपीचे नाव आहे. त्‍याला काल, 26 फेब्रुवारीला न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने 1 दिवसाची पोलीस कोठडी सुनावली. दरम्यान कसून चौकशीत खाक्या दाखवताच त्याने अनेक गुन्हे कबुल केल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली. खुटन याने 2016 मध्ये जळगाव जिल्ह्यातील पाचोरा आणि बुलडाणा जिल्ह्यातील जळगाव जामोद येथेही घरफोडी केल्याचे तपासात समोर आले आहे.
दोन वर्षांपूर्वी खुटनने त्याच्या 4 साथीदारांसह साकेगाव येथील रमेश भगवान लोखंडे यांना रस्त्यात अडवून तयांच्याकडून 48 हजार रुपये लुटले होते. तसेच साकेगावात दोन घरेही फोडली होती. मागील दोन वर्षांपासून तो फरार होता. आता तो हाती लागल्याने आणखी अनेक गुन्हे उघड होण्याची शक्यता पोलीस विभागातील सूत्रांनी वर्तविली आहे. जालना, जळगाव, परभणी आणि बुलडाणा जिल्ह्यात त्याने साथीदारांच्‍या मदतीने अनेक ठिकाणी घरफोडी केली असण्याची श्यक्यता आहे. जळगाव जिल्ह्यात त्याने पोलिसांवर दगडफेक सुद्धा केली होती.