चोर मचाये शोर… रात्रीतून दोन घरे फोडली!; बुलडाणा तालुक्यातील घटना

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः रात्रीतून दोन घर फोडून चोरट्यांनी पोलिसांना आव्हान दिले आहे. बुलडाणा तालुक्यातील सव आणि खुपगावमध्ये या चोर्या झाल्या. दोन्ही गावांमध्ये केवळ 2 किमीचे अंतर असल्याने दोन्ही घरफोड्या एकाच टोळीकडून झाल्या असण्याची नाकारता येत नाही. सव येथील घरफोडी प्रकरणी चोरट्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून, खुपगाव येथील घरफोडी प्रकरणी वृत्त लिहिपर्यंत …
 

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः रात्रीतून दोन घर फोडून चोरट्यांनी पोलिसांना आव्हान दिले आहे. बुलडाणा तालुक्यातील सव आणि खुपगावमध्ये या चोर्‍या झाल्या. दोन्ही गावांमध्ये केवळ 2 किमीचे अंतर असल्याने दोन्ही घरफोड्या एकाच टोळीकडून झाल्या असण्याची नाकारता येत नाही. सव येथील घरफोडी प्रकरणी चोरट्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून, खुपगाव येथील घरफोडी प्रकरणी वृत्त लिहिपर्यंत तक्रार दाखल करण्यात आली नव्हती.
गुलाबराव श्यामराव राजपूत यांचे सव येथे एक नवे आणि एक जुने असे दोन घरे आहेत. त्यापैकी जुन्या घरात सध्या ते राहत नसल्याने सामान ठेवण्यासाठी त्याचा उपयोग करतात. आज, 10 फेब्रुवारीला पहाटे पाचच्या दरम्यान त्यांचे जुने घर उघडे दिसल्यानंतर जाऊन बघितले असताना घराचे कुलूप चोरट्यांनी तोडल्याचे दिसून आले. चोरट्यांनी घरातील सामान अस्ताव्यस्त केले होते. घरातील लोखंडी कपाटात ठेवलेले रोख 30 हजार रुपये, दोन सोन्याचे ओम किंमत 3000 रुपये तसेच 1 जोड कानातील सोन्याच्या बाळ्या किंमत 3000 रुपये असा एकूण 36 हजार रुपयांचा मुद्देमाल चोरी गेला आहे.