चोरट्यांनी पंक्‍चर बुलेट केली लंपास; बुलडाणा शहरातील घटना

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः संचारबंदीचा फायदा उचलत चोरट्यांनी सर्क्युलर रोडवरील महाराणा प्रताप चौकात राहणारे संजय रामराव सोनुने यांच्या मालकीची बुलेट (क्र. एमएच २८ बीडी ८७८२) २४ मेच्या रात्री चोरून नेली. ही बुलेट पंक्चर असल्यामुळे घरासमोर उभी होती. सकाळी उठून बघितले तर बुलेट जागेवर दिसली नाही. बुलेटची अंदाजे किंमत १ लाख ९० हजार रुपये आहे. …
 

बुलडाणा (बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा)  ः संचारबंदीचा फायदा उचलत चोरट्यांनी सर्क्युलर रोडवरील महाराणा प्रताप चौकात राहणारे संजय रामराव सोनुने यांच्या मालकीची बुलेट (क्र. एमएच २८ बीडी ८७८२)  २४ मेच्‍या रात्री चोरून नेली. ही बुलेट पंक्‍चर असल्यामुळे घरासमोर उभी होती. सकाळी उठून बघितले तर बुलेट जागेवर दिसली नाही. बुलेटची अंदाजे किंमत १ लाख ९० हजार रुपये आहे. एक चाक पंक्‍चर असूनही चोरट्याने बुलेट कशी लांबविली याची चर्चा होत आहे.