चोरट्यांना शाळांचा मोह… रात्री शिकवायला कुणी नसताना हजेरी!; ज्ञानार्जनाऐवजी अर्थाजन!! तीन शाळा फोडून दीड लाखाचे साहित्य लांबवले!!; खामगाव तालुक्‍यातील घटना

खामगाव (भागवत राऊत ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः दोनच दिवसांपूर्वी खामगाव तालुक्यातील विहीगाव येथील तीन शाळा चोरट्यांनी फोडून टीव्हीसह साहित्य लंपास केले होते. त्यानंतर पुन्हा चोरट्यांनी आणखी काही शाळांना लक्ष्य केले आहे. आज, २६ जुलैला सकाळी तीन शाळा फोडून सुमारे दीड लाख रुपयांचे साहित्य लंपास केल्याचे समोर आले आहे. जागृती ज्ञानपीठ आंबेटाकळी, श्री संत नारायण …
 
चोरट्यांना शाळांचा मोह… रात्री शिकवायला कुणी नसताना हजेरी!; ज्ञानार्जनाऐवजी अर्थाजन!! तीन शाळा फोडून दीड लाखाचे साहित्य लांबवले!!; खामगाव तालुक्‍यातील घटना

खामगाव (भागवत राऊत ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः दोनच दिवसांपूर्वी खामगाव तालुक्यातील विहीगाव येथील तीन शाळा चोरट्यांनी फोडून टीव्हीसह साहित्य लंपास केले होते. त्‍यानंतर पुन्‍हा चोरट्यांनी आणखी काही शाळांना लक्ष्य केले आहे. आज, २६ जुलैला सकाळी तीन शाळा फोडून सुमारे दीड लाख रुपयांचे साहित्‍य लंपास केल्याचे समोर आले आहे.

जागृती ज्ञानपीठ आंबेटाकळी, श्री संत नारायण महाराज विद्यालय, आंबेटाकळी व कृष्णराव रामजी पाटील विद्यालय, बोरी अडगाव या ठिकाणी चोरट्यांनी डल्ला मारला. जागृती ज्ञानपीठच्या मुख्याध्यापकांनी आज हिवरखेड पोलीस स्टेशनला चोरीची तक्रार दिली. त्‍यांच्या शाळेतील वाचमन गोपाल नेमाने (रा. शिर्ला नेमाने) यांनी त्‍यांना सकाळी साडेसहाला फोन करून चोरीची माहिती दिली होती.

शाळेतील कार्यालयाचे व बाजूच्या वर्गखोलीची कुलूप तोडून सामान अस्ताव्यस्त दिसत असल्याचे त्‍याने सांगितले. त्‍यामुळे मुख्याध्यापकांनी शाळेत जाऊन पाहणी केली असता आहुजा कंपनीचे ॲम्प्लिफायर नग १ किंमत 10 हजार, जिओ कंपनीचे वायफाय किंमत १ हजार, डिव्हीआर किंमत ५ हजार रुपयांचे चोरून नेले व शाळेतील कार्यालयाजवळील सीसीटीव्ही कॅमेरे फोडून त्याची नासधूस केल्याचे दिसून आले. यात अंदाजे ५ हजार रुपयांचे नुकसान झाले. असा एकूण २१ हजारांचे साहित्य चोरीस गेले. दुसऱ्या घटनेत कृष्णाराव रामजी पाटील महाविद्यालय बोरी अडगाव येथील एलईडी टीव्ही व डिव्हीआर किंमत १५ हजार रुपये व डेल कंपनीचे सात संगणक संच किंमत १ लाख ५ हजार असे एकूण १ लाख २० हजार रुपयांचे साहित्य चोरीस गेले. तिसऱ्या घटनेत श्री संत नारायण महाराज विद्यालय आंबेटाकळी येथील वर्गखोल्यांचे व कपाटाचे कुलूप तोडून साहित्य अस्ताव्यस्त केल्‍याचे दिसून आले.