चालकाचे नियंत्रण सुटून कार झाडाला धडकली, एक ठार, तिघे जखमी, खामगाव तालुक्‍यातील घटना

खामगाव (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः चालकाचे नियंत्रण सुटून कार रस्त्याच्या बाजूच्या असलेल्या निंबाच्या झाडाला धडकली. यात एक जण जागीच ठार तर तिघे जखमी झाले. ही घटना खामगाव -शेगाव रस्त्यावरील जयपूर लांडे (ता. खामगाव) फाट्याजवळ काल, २० जूनला रात्री साडेसातच्या सुमारास घडली. विठ्ठल म्हैसरे (रा. नांदुरा) असे ठार झालेल्याचे नाव आहे. शिवाजी क्षीरसागर, प्रवीण धामोतकर (दोघे …
 

खामगाव (बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः चालकाचे नियंत्रण सुटून कार रस्‍त्‍याच्‍या बाजूच्‍या असलेल्या निंबाच्‍या झाडाला धडकली. यात एक जण जागीच ठार तर तिघे जखमी झाले. ही घटना खामगाव -शेगाव रस्‍त्‍यावरील जयपूर लांडे (ता. खामगाव) फाट्याजवळ काल, २० जूनला रात्री साडेसातच्‍या सुमारास घडली.

विठ्ठल म्‍हैसरे (रा. नांदुरा) असे ठार झालेल्याचे नाव आहे. शिवाजी क्षीरसागर, प्रवीण धामोतकर (दोघे रा. नांदुरा), संदीप काळे (रा. वाशीम) अशी जखमींची नावे आहेत. काळे नांदुरा येथील एचडीएफसी बँकेत मॅनेजर आहेत. ते सहकाऱ्यांसह शेगावला दर्शनासाठी कारने (क्रमांक एमएच ३७, व्‍ही १८२२) जात होते. जयपूर लांडे फाट्याजवळ चालकाचे कारवरील नियंत्रण सुटून अपघात झाला. जखमींना खामगाव येथील सामान्य रुग्‍णालयात दाखल करण्यात आले.