घरासमोर उभी दुचाकी जाळली!; खामगावातील घटना, दोघांविरुद्ध गुन्‍हा

खामगाव (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः घरासमोर उभी मोटारसायकल जाळून दोघांनी पळ काढल्याची घटना खामगाव शहरात 22 मे रोजी रात्री घडली. या प्रकरणी दुचाकीमालकाने काल, 23 मे रोजी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून दोघांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. खामगावातील जुनाफैल हमालपुरा भागात राहणारे अक्षय दादाराव कांबळे यांनी त्यांची मोटारसायकल घरासमोर उभी केलेली होती. 22 मे रोजी …
 

खामगाव (बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः घरासमोर उभी मोटारसायकल जाळून दोघांनी पळ काढल्याची घटना खामगाव शहरात 22 मे रोजी रात्री घडली. या प्रकरणी दुचाकीमालकाने काल, 23 मे रोजी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून दोघांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

खामगावातील जुनाफैल हमालपुरा भागात राहणारे अक्षय दादाराव कांबळे यांनी त्यांची मोटारसायकल घरासमोर उभी केलेली होती. 22 मे रोजी रात्री ते घरात झोपलेले असताना त्यांना घराबाहेर लोकांच्या ओरडण्याचा आवाज ऐकू आला असता त्यांनी व त्‍यांची आई सुंदराबाई कांबळे यांनी बाहेर येऊन पाहिले. तेव्‍हा त्यांच्या मोटारसायकलला आग लागलेली होती. त्यावेळी तिथे जवळच उभे असलेले गजानन खंडारे व सुनील खंडारे हे अक्षय कांबळे यांना पाहून पळून जाताना दिसले. दोघा मायलेकांनी त्यांना आवाज देऊन थांबविण्याचा प्रयत्‍न केला असता सुनील खंडारे याने तुझ्याच्याने काय होते ते करून घे, अशी धमकी दिल्याची व मोटारसायकल जाळून 40 हजार रुपयांचे नुकसान केल्याची तक्रार शिवाजीनगर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. याप्रकरणी सुनील खंडारे व गजानन खंडारे दोघेही (रा. हमालपुरा, खामगाव) यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास शिवाजीनगर पोलीस ठाण्याचे एएसआय अरविंद राऊत करत आहेत.