घराला लागली भीषण आग; नशीब बलवत्तर म्हणून जीव वाचला; शेतकऱ्याचे कुटुंब उघड्यावर आले; गहू, तुरीची डाळ, उडदाची डाळ, मुगाची डाळ, रोख रक्कम सगळ काही आगीत भस्मसात झालं...! गोवर्धन नगर येथील घटना....

 
 बिबी(श्रीकृष्ण पंधे:बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): लोणार तालुक्यातील गोवर्धन नगर येथे काल, बुधवारी रात्री भीषण घटना घडली. घराला लागलेल्या अजित शेतकऱ्याचे मोठे नुकसान झाले.. या आगीमुळे शेतकरी कुटुंब उघड्यावर आले आहे..
  प्राप्त माहितीनुसार ४ डिसेंबरच्या सायंकाळी ७ वाजेच्या सुमारास गोवर्धन नगर येथील किसन दासू चव्हाण (७५) यांच्या घराला अज्ञात कारणामुळे भीषण आग लागली. किसन चव्हाण यांना दोन मुले असून दोन्हीही गतिमंद आहेत, नशीब बनवत तर म्हणून या आगीत शेतकरी कुटुंबाचा जीव वाचला मात्र आगीत घरातील सर्व साहित्य भस्मसात झाले आहे. घरातील १५ क्विंटल सोयाबीन, गहू, तुरीची डाळ, उडदाची डाळ, मुगाची डाळ व रोख ७० हजार रुपये जळून खाक झाले आहेत. गावकऱ्यांच्या मदतीने आग आटोक्यात आणण्यात आली. पोलीस व महसूल प्रशासनाच्या वतीने पंचनामा करून वरिष्ठांकडे पाठविण्यात येणार आहे. या प्रकरणाचा पुढील तपास बीबी पोलीस करीत आहेत...