ग्राम रोजगार सेवकाने केली आत्‍महत्‍या; चिखली तालुक्‍यातील घटना

चिखली (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः ४० वर्षीय रोजगार सेवकाने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना कव्हळा (ता. चिखली) येथे आज, २७ जुलैला सकाळी समोर आली. रामेश्वर दामोधर ढोरे असे आत्महत्या केलेल्या व्यक्तीचे नाव आहे.ढोरे हे ॲपेही चालवायचे. त्यांनी घरातील बाथरूममध्ये लोखंडी हुकला गळफास घेतला. घटनेची माहिती मिळताच अमडापूर पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला. या प्रकरणी …
 

चिखली (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः ४० वर्षीय रोजगार सेवकाने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना कव्हळा (ता. चिखली) येथे आज, २७ जुलैला सकाळी समोर आली. रामेश्वर दामोधर ढोरे असे आत्महत्या केलेल्या व्यक्तीचे नाव आहे.
ढोरे हे ॲपेही चालवायचे. त्यांनी घरातील बाथरूममध्ये लोखंडी हुकला गळफास घेतला. घटनेची माहिती मिळताच अमडापूर पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला. या प्रकरणी पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे. रामेश्वर यांच्या पश्चात आई, पत्नी, एक मुलगा, एक मुलगी, दोन भाऊ असा परिवार आहे. आत्महत्येचे नेमके कारण अद्यापपर्यंत समोर आले नव्हते.