ग्रामपंचायत कार्यालयातच ग्रामसेवकाला दमदाटी, लोटपोट!; जीवे मारण्याची धमकी; खामगाव तालुक्‍यातील घटना

खामगाव (भागवत राऊत ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः ग्रामसेवकाला शिविगाळ करून सरकारी कामाचे रजिस्टर फाडण्याचा प्रयत्न करत जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी खामगाव शहर पोलिसांनी वाडी (ता. खामगाव) येथील एका ग्रामस्थाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. सोपान ज्ञानदेव इंगळे असे गुन्हा दाखल झालेल्याचे नाव आहे. या प्रकरणी ग्रामसेवक महादेव नामदेव देवकर यांनी तक्रार दिली आहे. तक्रारीत ग्रामसेवकाने …
 

खामगाव (भागवत राऊत ः बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः ग्रामसेवकाला शिविगाळ करून सरकारी कामाचे रजिस्‍टर फाडण्याचा प्रयत्‍न करत जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी खामगाव शहर पोलिसांनी वाडी (ता. खामगाव) येथील एका ग्रामस्‍थाविरुद्ध गुन्‍हा दाखल केला आहे.

सोपान ज्ञानदेव इंगळे असे गुन्‍हा दाखल झालेल्याचे नाव आहे. या प्रकरणी ग्रामसेवक महादेव नामदेव देवकर यांनी तक्रार दिली आहे. तक्रारीत ग्रामसेवकाने म्‍हटले आहे, की सोपान हा 27 एप्रिलच्‍या सकाळी 10.15 च्‍या सुमारास ग्रामपंचायत कार्यालयात आला. त्‍याने ग्रामसेवक महादेव देवकर यांना बसथांब्‍याजवळील हातपंप बंद आहेत. त्याला चालू का करत नाहीत. हातपंप लवकरात लवकर चालू करा, असे सांगितले. ग्रामसेवकाने सोपानला पंचायत समितीकडे हातपंप दुरुस्तीचे पत्र सादर केल्‍याचे सांगितले. मात्र सोपान ऐकण्याच्‍या मनःस्‍थितीत नव्‍हता. त्‍याने ग्रामसेवकाला शिविगाळ करून टेबलवरील सरकारी कामाचे रजिस्टर उचलून फाडण्याचा प्रयत्‍न केला. लोटपोट करून जीवे मारण्याची धमकी दिली. त्‍यावरून सोपानविरुद्ध गुन्‍हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोलीस उपनिरिक्षक रंजितसिंह ठाकूर करत आहेत.