गोळ्या-बिस्किटांच्‍या दुकानात दीड लाखाची चोरी; खामगावातील घटना

खामगाव (भागवत राऊत ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः गोळ्या बिस्किटांचे दुकान फोडून गोळ्या बिस्किटे, सिगारेटसह दीड लाखाचा मुद्देमाल चोरट्यांनी लंपास केला. ही घटना खामगाव शहरातील आठवडे बाजारात 16 जूनच्या सकाळी उघडकीस आली. आठवडे बाजारात ओमप्रकाश गुरवानी यांचे सद्गुरू स्वीट्स हे गोळ्या- बिस्किटांचे होलसेलचे दुकान आहे. शहरातील मध्यवस्तीत असलेल्या या दुकानात 15 जूनच्या रात्री चोरट्यांनी धुडगूस …
 

खामगाव (भागवत राऊत ः बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः गोळ्या बिस्किटांचे दुकान फोडून गोळ्या बिस्किटे, सिगारेटसह दीड लाखाचा मुद्देमाल चोरट्यांनी लंपास केला. ही घटना खामगाव शहरातील आठवडे बाजारात 16 जूनच्या सकाळी उघडकीस आली. आठवडे बाजारात ओमप्रकाश गुरवानी यांचे सद्‌गुरू स्वीट्स हे गोळ्या- बिस्किटांचे होलसेलचे दुकान आहे. शहरातील मध्यवस्तीत असलेल्या या दुकानात 15 जूनच्या रात्री चोरट्यांनी धुडगूस घातला. सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची तोडफोड करून माल चोरून नेला. दुकानाचे मालक ओमप्रकाश गुरवानी यांनी खामगाव पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.