गोठ्याला आग लागून तीन जनावरांचा होरपळून मृत्यू; नांदुरा तालुक्‍यातील घटना

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः गोठ्याला आग लागून 3 जनावरांचा आगीत होरळपून मृत्यू झाल्याची घटना आज, 25 एप्रिलला सकाळी 11 वाजेच्या सुमारास जवळा बाजार (ता. नांदुरा) येथे घडली. संजय शिंगोटे यांचा हा गोठा होता. आग एवढी भीषण होती की तीन गुरे जागीच मृत्यूमुखी पडली. गोठ्यात ठेवलेला पीव्हीसी पाईप संच व अन्य शेतीउपयोगी अवजारेही जळून खाक …
 

बुलडाणा (बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः गोठ्याला आग लागून 3 जनावरांचा आगीत होरळपून मृत्यू झाल्याची घटना आज, 25 एप्रिलला सकाळी 11 वाजेच्या सुमारास जवळा बाजार (ता. नांदुरा) येथे घडली.

संजय शिंगोटे यांचा हा गोठा होता.  आग एवढी भीषण  होती की तीन गुरे जागीच मृत्यूमुखी पडली. गोठ्यात ठेवलेला पीव्हीसी पाईप संच व अन्य शेतीउपयोगी अवजारेही जळून खाक झाली. त्यामुळे शिंगोटे यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले. गावकऱ्यांनी पाण्याचे टॅंकर रिचवून आगीवर नियंत्रण मिळवले. घटनेचे वृत्त कळताच  मलकापूर विधानसभा  मतदारसंघाचे आमदार राजेश एकडे यांनी घटनास्थळी भेट दिली. तहसीलदार नांदुरा व पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांना पंचनामा करण्याच्या सूचना दिल्या.