गस्‍त घालणाऱ्या वनरक्षकाने दुर्गंधी आली म्‍हणून बघितले, समोरील दृश्य पाहून हादरला!; जळगाव जामोद तालुक्‍यातील घटना

जळगाव जामोद (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः जळगाव जामोद तालुक्यातील सुनगावजवळ ६५ वर्षीय वृद्धाचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत आढळला. २१ जुलैच्या सकाळी सातच्या सुमारास वनरक्षक अरुण गुलाबराव भुईकर (३०) हे गस्त घालत असताना त्यांना दुर्गंधी आल्याने त्यांनी जाऊन पाहिले असता मृतदेह दिसला. भुईकर यांनी घटनेची माहिती जळगाव जामोद पोलिसांना दिली. पोलीस निरीक्षक सुनील जाधव, पोलीस हेड कॉन्स्टेबल …
 

जळगाव जामोद (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः जळगाव जामोद तालुक्यातील सुनगावजवळ ६५ वर्षीय वृद्धाचा मृतदेह कुजलेल्या अवस्‍थेत आढळला. २१ जुलैच्या सकाळी सातच्या सुमारास वनरक्षक अरुण गुलाबराव भुईकर (३०) हे गस्‍त घालत असताना त्‍यांना दुर्गंधी आल्‍याने त्‍यांनी जाऊन पाहिले असता मृतदेह दिसला.

भुईकर यांनी घटनेची माहिती जळगाव जामोद पोलिसांना दिली. पोलीस निरीक्षक सुनील जाधव, पोलीस हेड कॉन्स्टेबल विनोद वानखडे, पोलीस हेडकॉन्स्टेबल श्री. राऊत, पोलीस कॉन्स्टेबल श्री. इंगळे, पोलीस नाईक गणेश पाटील, वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी तसेच वनविभागाचे कर्मचारी सर्व घटनास्थळी आले. त्यांनी मृतदेहाचा पंचनामा केला. मृतदेह पूर्णपणे सडल्‍याने फक्त हाडांचा सापळा बाकी होता. त्यामुळे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी घटनास्थळीच मृतदेहाचे नमुने घेतले. त्‍यानंतर ग्रामपंचायत हद्दीत ई क्लास जागेवर अंत्यविधी करण्यात आला. तूर्त पोलिसांनी आकस्मिक मृत्‍यूची नोंद केली आहे. तपास पोलीस निरीक्षक सुनील जाधव यांच्या मार्गदर्शनात पोलिस हेडकॉन्स्टेबल अशोक वावगे करत आहेत.