खुनानंतर हातपाय बांधून, पोटाला दगड बांधून फेकले नदीत!; मृतदेह वाहत आला पेनसावंगीत!!

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः हातपाय बांधलेला, पोटाला दगड बांधून मृतदेह नदीत फेकून दिल्यानंतर तो वाहत पेनसावंगी (ता. चिखली) पर्यंत आला. पोलीस पाटलांनी मृतदेह पाहिल्यानंतर तातडीने अमडापूर पोलिसांना कळवले. एकूण परिस्थितीवरून हा खुनाचा प्रकार असल्याची दाट शक्यता वर्तविण्यात येत आहे. पेनसावंगीच्या पोलीस पाटील सौ. गिता प्रविण शेजोळ (30) यांची गावाच्या शिवारात 30 एकर शेती आहे. …
 

बुलडाणा (बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः हातपाय बांधलेला, पोटाला दगड बांधून मृतदेह नदीत फेकून दिल्यानंतर तो वाहत पेनसावंगी (ता. चिखली) पर्यंत आला. पोलीस पाटलांनी मृतदेह पाहिल्यानंतर तातडीने अमडापूर पोलिसांना कळवले. एकूण परिस्‍थितीवरून हा खुनाचा प्रकार असल्याची दाट शक्‍यता वर्तविण्यात येत आहे.

पेनसावंगीच्‍या पोलीस पाटील सौ. गिता प्रविण शेजोळ (30) यांची गावाच्‍या शिवारात 30 एकर शेती आहे. 3 जूनला दुपारी साडेचारच्‍या सुमारास त्‍यांना त्‍यांचे पती प्रविण शेजोळ यांच्याकडून मृतदेहाची माहिती कळली. त्‍यांनी जाऊन पाहिले असता पैनगंगा नदीच्या पुलाखाली एका व्‍यक्‍तीचा मृतदेह तरंगून आलेला दिसला. त्‍यांनी बिट हवालदार श्री शिंदे यांना दूरध्वनीव्दारे कळवले. थोड्या वेळाने तेथे ठाणेदार श्री. वानखेडे हे पोलीस पथकासह आले. मृतदेह बाहेर काढण्यात आला. मृतदेहाचे हात व पाय दोरीने बांधून, पोटाजवळ दगड बांधलेला दिसला. हा मृतदेह पेनसावंगीत कुणाच्‍या ओळखीचा नव्‍हता.

असे आहे वर्णन….
वय साधारण 50 वर्षे, पांढरे चौकडीचे शर्ट, काळी पँट, पायात काळा बूट, डाव्या हातात टायटन कंपनीची सोनेरी मेटलची पट्टा असलेली घड्याळ.
ओळख पटविण्याचे आव्‍हान…
मृतदेह आढळलेल्या व्‍यक्‍तीस कोणीतरी जिवानिशी ठार करण्याच्‍या उद्देशाने व पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने त्याचे हात व पाय दोरीने बांधून तसेच त्याच्या पोटाजवळ दगड बांधून पैनगंगा नदीमध्ये जिवानिशी ठार करून फेकून दिले आहे. या प्रकरणी पोलीस पाटील सौ. गीता शेजोळ यांच्‍या तक्रारीवरून अज्ञात व्‍यक्‍तीविरुद्ध गुन्‍हा दाखल करण्यात आला आहे.