खामगाव शहरात पोलिसांचे पथसंचलन, दंगा काबू पथकाचेही प्रात्‍यक्षिक

खामगाव (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर आज, १९ जुलैला दुपारी साडेबाराला खामगाव शहरात पोलिसांनी पथसंचलन केले. शिवाजीनगर व शहर पोलीस स्टेशन हद्दीत हे पथसंचलन करण्यात आले. शहर पोलीस स्टेशन, महावीर चौक, फरशी, राणा गेट, मस्तान चौक, निर्मल टर्निंग, केडिया टर्निंग या मुख्य मार्गावर हे संचलन करण्यात आले. उपविभागीय पोलीस अधीक्षक अमोल कोळी, खामगाव …
 

खामगाव (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः बकरी ईदच्या पार्श्‍वभूमीवर आज, १९ जुलैला दुपारी साडेबाराला खामगाव शहरात पोलिसांनी पथसंचलन केले. शिवाजीनगर व शहर पोलीस स्टेशन हद्दीत हे पथसंचलन करण्यात आले.

शहर पोलीस स्टेशन, महावीर चौक, फरशी, राणा गेट, मस्तान चौक, निर्मल टर्निंग, केडिया टर्निंग या मुख्य मार्गावर हे संचलन करण्यात आले. उपविभागीय पोलीस अधीक्षक अमोल कोळी, खामगाव शहर पोलीस स्टेशनचे ठाणेदार सुनील अंबुलकर, शिवाजी नगर पोलीस स्टेशनचे ठाणेदार सुनील हूड यांच्यासह शहर पोलीस स्टेशन व शिवाजी नगर पोलीस स्टेशनचे पोलीस कर्मचारी,होमगार्ड, आरसीपी जवान यांनी पथसंचलनात सहभाग घेतला. टिळक पुतळ्याजवळ पथ संचलनाचा समारोप करण्यात आला. दंगा काबू पथकाने नागरिकांवर लाठीचार्ज करण्याचे प्रात्यक्षिक करून दाखवले.