खामगावात जुगार अड्ड्यावरील छाप्यात 7 जण पकडले, दीड लाखाचा मुद्देमाल जप्‍त

खामगाव (भागवत राऊत ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः खामगाव शहरातील घाटपुरी रस्त्यावरील किसननगरात शिवाजीनगर पोलिसांनी काल, 15 एप्रिलला सायंकाळी सव्वासातच्या सुमारास जुगार अड्ड्यावर छापा मारून 7 जणांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून 1 लाख 45 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. मिलिंद विजय वास्कर, दीपक हर्षद कमानी, भगवान अर्जुन मिरगे, मनेश देविदास खोडके, चेतन गजानन चोपडे, अश्विन विजय …
 

खामगाव (भागवत राऊत ः बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः खामगाव शहरातील घाटपुरी रस्‍त्‍यावरील किसननगरात शिवाजीनगर पोलिसांनी काल, 15 एप्रिलला सायंकाळी सव्वासातच्‍या सुमारास  जुगार अड्ड्यावर छापा मारून 7 जणांना ताब्‍यात घेतले. त्‍यांच्‍याकडून 1 लाख 45 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्‍त करण्यात आला आहे.

मिलिंद विजय वास्कर, दीपक हर्षद कमानी, भगवान अर्जुन मिरगे, मनेश देविदास खोडके, चेतन गजानन चोपडे, अश्विन विजय वास्कर, गणेश सुधाकर काटे (सर्व रा. खामगाव) अशी पकडण्यात आलेल्या जुगाऱ्यांची नावे आहेत. गुप्त माहितीच्‍या आधारे पोलिसांनी छापा मारला असता हे जुगारी लोकांकडून पैसे घेऊन वरली मटका नावाचा जुगार खेळताना व खेळविताना मिळून आले. त्यांच्याकडून जुगार साहित्य, नगदी 4 हजार 100 रुपये, मोटारसायकल किंमत 1 लाख 40 हजार रुपये, मोबाइल किंमत 1 हजार 500 रुपये व ताशपत्ते 20 रुपयांचे असा एकूण 1 लाख 45  हजार 720 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. तपास नापोकाँ देवेंद्र शेळके करत आहेत. ही कारवाई पोलीस उपनिरिक्षक राहुल चव्हाण यांच्‍यासह सहकाऱ्यांनी केली.