खामगावमध्ये फोडले दोन मेडिकल; तीन लाखांचा मुद्देमाल लंपास; चोरटे सीसीटीव्हीत कैद

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः चोरट्यांनी खामगाव शहरातील दोन मेडिकल स्टोअर फोडून तीन लाख रुपयांचा मुद्देमाल लंपास केल्याची घटना आज, २२ जून रोजी उघडकीस आली. चोरीची घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून, आज पहाटे ३ ते ३:३० च्या दरम्यान ही चोरी झाल्याचे सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसत आहे. खामगाव शहरातील नांदुरा मार्गावरील डॉ. टिकार यांच्या तुळजाई हॉस्पिटलशी …
 

बुलडाणा (बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः चोरट्यांनी खामगाव शहरातील दोन मेडिकल स्टोअर फोडून तीन लाख रुपयांचा मुद्देमाल लंपास केल्याची घटना आज, २२ जून रोजी उघडकीस आली. चोरीची घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून, आज पहाटे ३ ते ३:३० च्या दरम्यान ही चोरी झाल्याचे सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसत आहे.

खामगाव शहरातील नांदुरा मार्गावरील डॉ. टिकार यांच्या तुळजाई हॉस्पिटलशी संलग्न असलेले तुळजाई मेडिकल व लाईफलाईन हॉस्पिटल संलग्न सुभाष मेडिकलमध्ये ही चोरी करण्यात आली. चोरटे कारने आले होते. त्यांच्या सोबतच्या लोखंडी टॉमी व कटरच्या सहाय्याने त्यांनी मेडिकलच्या शटरचे कुलूप तोडून आत प्रवेश केला. यात तुळजाई मेडिकलमधील रोख ६० हजार व सुभाष मेडिकलमधील २ लाख ५० हजारांचा मुद्देमाल लंपास करण्यात आला. याप्रकरणी खामगाव शहर पोलीस ठाण्यात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बेराळ्यातही चोरीची घटना
शेतातील रसवंतीचे टिनशेड फोडून खुर्च्या, सोयाबीनचे बियाणे आणि खत चोरट्यांनी चोरून नेले. ही घटना आज, २२ जून रोजी बेराळा (ता. चिखली) येथे उघडकीस आली. चिखली- देऊळगाव राजा रोडवर लक्ष्मण सुरडकर यांचे शेत आहे. रोडला लागूनच त्यांचे गौरी रसवंती आहे. त्यासाठी केलेल्या टिनशेडमध्ये त्यांनी खुर्च्या व पेरणीसाठी सोयाबीनचे बियाणे व खत ठेवले होते. आज सकाळी ते शेतात आले असता त्यांना टिनशेड फोडलेले आढळले. आतील २० खुर्च्या, १ क्विंटल सोयाबीनचे बियाणे व ७ बॅग खत चोरीला गेल्याचे दिसले. चिखली पोलीस ठाण्यात याप्रकरणी चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.