खामगावमध्ये दोन आत्‍महत्‍या, एकाने गाव शिवारात तर दुसऱ्याने घरात घेतला गळफास!

खामगाव (भागवत राऊत ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः खामगाव तालुक्यात दोन आत्महत्येच्या घटना समोर आल्या असून, एकाने गाव शिवारात तर दुसऱ्याने घरातच सिलिंग फॅनला गळफास घेऊन जीवनयात्रा संपवली. या दोन्ही घटना आज, २८ जुलैला समोर आल्या. पारखेड शिवारात (ता. खामगाव) ऋषी महाराजांच्या मंदिर परिसरात रामेश्वर श्रीकृष्ण लाहूळकार (४५, रा. पारखेड ता.खामगाव) याने झाडाला आज, २८ …
 

खामगाव (भागवत राऊत ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः खामगाव तालुक्‍यात दोन आत्‍महत्‍येच्‍या घटना समोर आल्या असून, एकाने गाव शिवारात तर दुसऱ्याने घरातच सिलिंग फॅनला गळफास घेऊन जीवनयात्रा संपवली. या दोन्‍ही घटना आज, २८ जुलैला समोर आल्या.

पारखेड शिवारात (ता. खामगाव) ऋषी महाराजांच्‍या मंदिर परिसरात रामेश्वर श्रीकृष्ण लाहूळकार (४५, रा. पारखेड ता.खामगाव) याने झाडाला आज, २८ जुलैला दुपारी अडीचपूर्वी गळफास घेतला. शेतात जातो असे सांगून तो घरातून बाहेर पडला होता. त्‍यांचे भाऊ ज्ञानेश्वर यांनी खामगाव ग्रामीण पोलिसांना घटनेची माहिती दिली. पोलिसांनी घटनास्‍थळी येऊन पंचनामा केला व मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठवला. आत्‍महत्‍येचे कारण अद्याप समोर आलेले नाही. तपास पोहेकाँ देवराव धांडे करत आहेत.
खामगाव शहरातील माखरीया मैदान भागात राहणाऱ्या राजेश तुकाराम गायकवाड (३८) याने दारूचे नशेत राहत्‍या घरी सिलिंग पंख्याला गळफास घेऊन आज, २८ जुलैला दुपारी दोनपूर्वी आत्महत्या केली. घटनेची माहिती त्‍याचा भाऊ नितीन यांनी खामगाव शहर पोलिसांना कळवली. पोलिसांनी घटनास्‍थळी येत पंचनामा केला व मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठवला. तपास पोहेकाँ विनोद शेळके करत आहेत.