खामगावमध्ये डॉक्‍टरांच्‍या घरात चोरी

खामगाव (भागवत राऊत ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः चोरट्याने डॉक्टरांच्या घरात घुसून आलमारीतील साडेनऊ हजार रुपये लंपास केले. ही घटना खामगाव शहरातील किसननगरात 24 मे रोजी सकाळी साडेदहाच्या सुमारास घडली. डॉ. विनोद शिवाजी वानखडे (46) यांची पत्नी 24 मे रोजी सकाळी कामानिमित्त थोड्या वेळेकरिता घराबाहेर गेल्या. ही संधी साधून चोरट्याने त्यांच्या घरात प्रवेश करून आलमारीतील …
 
खामगावमध्ये डॉक्‍टरांच्‍या घरात चोरी

खामगाव (भागवत राऊत ः बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा)  ः चोरट्याने डॉक्‍टरांच्‍या घरात घुसून आलमारीतील साडेनऊ हजार रुपये लंपास केले. ही घटना खामगाव शहरातील किसननगरात 24 मे रोजी सकाळी साडेदहाच्‍या सुमारास घडली.

डॉ. विनोद शिवाजी वानखडे (46) यांची पत्‍नी 24 मे रोजी सकाळी कामानिमित्त थोड्या वेळेकरिता घराबाहेर गेल्या. ही संधी साधून चोरट्याने त्यांच्या घरात प्रवेश करून आलमारीतील 9 हजार 500 रुपये रोख लंपास केले. या प्रकरणी डॉ. वानखडे यांनी शिवाजीनगर पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली. त्‍यावरून चोरट्याविरुद्ध गुन्‍हा दाखल करण्यात आला असून, तपास पोहेकाँ गजानन चोपडे करत आहेत.