खाऊच्‍या आमिषाने जंगलात नेऊन बालकावर अनैसर्गिक अत्‍याचार; मेहकर तालुक्‍यातील घटना

मेहकर (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः ११ वर्षीय बालकाला खाऊचे आमिष दाखवून जंगलात नेऊन त्याच्यावर अनैसर्गिक अत्याचार करण्यात आला. विकृतीचा कळस गाठणारी ही घटना मेहकर तालुक्यातील निंबा शिवारात काल, २ जुलैला सायंकाळी साडेचारच्या सुमारास घडली. याप्रकरणी जानेफळ पोलीस ठाण्यात गणेश शेषराव बुटाले (२५, रा. जानेफळ, ता. मेहकर) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस सूत्रांनी दिलेल्या …
 

मेहकर (बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः ११ वर्षीय बालकाला खाऊचे आमिष दाखवून जंगलात नेऊन त्याच्यावर अनैसर्गिक अत्याचार करण्यात आला. विकृतीचा कळस गाठणारी ही घटना मेहकर तालुक्यातील निंबा शिवारात काल, २ जुलैला सायंकाळी साडेचारच्‍या सुमारास घडली. याप्रकरणी जानेफळ पोलीस ठाण्यात गणेश शेषराव बुटाले (२५, रा. जानेफळ, ता. मेहकर) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, जानेफळ येथील गणेश बुटाले या तरुणाने तो राहत असलेल्या भागातीलच एका बालकाला खाऊचे अामिष दाखवले. चल तुला खाऊ देतो असे म्हणत त्याला निंबा शिवारातील जंगलात नेले. तेथे चाकूचा धाक दाखवत त्‍याच्‍या अनैसर्गिक संभोग केला. प्रकारानंतर अल्पवयीन बालकास वेदना होऊ लागल्याने त्याने आपल्या आई- वडिलांना घडलेली हकीकत सांगितली. हकीकत एेकून धक्का बसलेल्या बालकाच्या वडिलांनी जानेफळ पोलीस ठाण्यात धाव घेऊन प्रकरणाची तक्रार दिली. तक्रारीवरून पोलिसांनी गणेश बुटाले याच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. पीडित बालक अनुसूचित जाती प्रवर्गातील असल्याने आरोपीविरुद्ध ॲट्रॉसिटी कायद्याअंतर्गतही गुन्हा सुद्धा दाखल करण्यात आला आहे. आरोपी सध्या फरार आहे. तपास उपविभागीय पोलीस अधिकारी विलास यमावार करीत आहेत.