खळबळजनक..! सख्ख्या भावानेच केला भावाचा खून; संग्रामपूर हादरले

 
 संग्रामपूर(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): संग्रामपूर तालुक्यातील खिरोडी येथे खळबळजनक प्रकार समोर आला आहे. सख्या दोन भावांमध्ये वाद होऊन मोठ्या भावाने लहान भावाचा खून केल्याचा प्रकार घडला आहे.
शेळके
Advt 👆
पोलीस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार मंगेश विठ्ठल भिवटे (२८) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे तर संदीप भिवटे असे आरोपीचे नाव आहे. मंगेश भिवटे दारू पिऊन घरी आला म्हणून मोठा भाऊ संदीपने त्याला दारू पिऊन का आला अशी विचारली केली.त्यातून दोन भावांमध्ये वाद वाढत गेला. मोठा भाऊ संदीप ने मंगेशला लोखंडी फुकनी आणि फावड्याच्या दांड्याने मारहाण केली. त्यानंतर बराच वेळ मंगेश रस्त्यावर पडून होता. थोड्या वेळाने चुलत भावाने मंगेशला दवाखान्यात नेले. मात्र उपचारादरम्यान मंगेशचा मृत्यू झाला. काल,१२ मार्च रोजी संदीप विरूद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला अटक करण्यात आली आहे..