कोरोनामुळे कुटुंबात वाढली भांडणे; देऊळगाव राजात भावालाच मारहाण

देऊळगाव राजा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः तुझ्यामुळे वडिलांना कोरोना झाला, असे म्हणून भावानेच मोठ्या भावाला मारहाण केली. स्टीलची बकेट तोंडावर मारली. ही घटना देऊळगाव राजा शहरातील अमृतनगरात काल, 7 जूनला रात्री 9 च्या सुमारास घडली. सुनिल भगवान झोरे (38, रा. अमृतनगर, देऊळगाव राजा) यांनी या प्रकरणात तक्रार दिली आहे. त्यांनी तक्रारीत म्हटले आहे, की पत्नी …
 

देऊळगाव राजा (बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः तुझ्यामुळे वडिलांना कोरोना झाला, असे म्‍हणून भावानेच मोठ्या भावाला मारहाण केली. स्‍टीलची बकेट तोंडावर मारली. ही घटना देऊळगाव राजा शहरातील अमृतनगरात काल, 7 जूनला रात्री 9 च्‍या सुमारास घडली.

सुनिल भगवान झोरे (38, रा. अमृतनगर, देऊळगाव राजा) यांनी या प्रकरणात तक्रार दिली आहे. त्‍यांनी तक्रारीत म्‍हटले आहे, की पत्‍नी सौ. रेखा, लहान भाऊ समाधान झोरे व आई सौ. कांताबाई भगवान झोरे, वडील भगवान झोरे यांच्‍यासह ते राहतात. वडील भगवान झोरे कोरोना पॉझिटिव्‍ह होते. त्यांच्‍यावर उपचार करून त्यांना दवाखान्यातून काल घरी आणले.

रात्री 9 च्‍या सुमारास लहान भाऊ समाधान दारू पिऊन घरी आला. आईला म्हणाला की, सुनिलमुळेच वडिलांना कोरोना झाला. त्याने घरातील स्टीलची बकेट सुनील यांच्‍या तोंडावर मारली. बुक्‍क्याने डाव्या डोळ्यांवर मारहाण केली. पत्‍नी सौ. रेखा हिलासुध्दा शिविगाळ केली. बायको, मुलाबाळासह घराचे बाहेर निघून जा, असे म्हणाला. या तक्रारीवरून पोलिसांनी समाधानविरुद्ध गुन्‍हा दाखल केला आहे.