कोतवाल सुरपाटणे आत्‍महत्‍या… आणखी दोन कर्मचारी निलंबित!

मोताळा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा)ः मोताळा तहसील कार्याल्ायातील कोतवाल विष्णू सुरपाटणे यांच्या आत्महत्या प्रकरणातील आणखी दोन संशयित कर्मचाऱ्यांना जिल्हा प्रशासनाने निलंबित केले आहे. यापूर्वीच एका कोतवालाचे या प्रकरणात निलंबन झाले आहे. सुरपाटणे यांनी २७ जूनला तहसीलदारांच्या बंगल्यात गळफास घेऊन आत्महत्या केली होती. त्यांच्या सुसाईड नोटमध्ये लिपिक संजय पारखेडकर, शिपाई नंदकिशोर पाखरे, कोतवाल विनोद अनकुरणे यांची नावे …
 

मोताळा (बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा)ः मोताळा तहसील कार्याल्‍ायातील कोतवाल विष्णू सुरपाटणे यांच्‍या आत्‍महत्‍या प्रकरणातील आणखी दोन संशयित कर्मचाऱ्यांना जिल्हा प्रशासनाने निलंबित केले आहे. यापूर्वीच एका कोतवालाचे या प्रकरणात निलंबन झाले आहे.

सुरपाटणे यांनी २७ जूनला तहसीलदारांच्‍या बंगल्यात गळफास घेऊन आत्‍महत्‍या केली होती. त्‍यांच्‍या सुसाईड नोटमध्ये लिपिक संजय पारखेडकर, शिपाई नंदकिशोर पाखरे, कोतवाल विनोद अनकुरणे यांची नावे होती. या तिघांविरुद्ध पोलिसांनी गुन्‍हे दाखल केले आहेत. पारखेडकर आणि पाखरे यांना आता निलंबित केले आहे. लिपिक पारखेडकर आणि कोतवाल अनकुरणे यांना नागपूर उच्च न्‍यायालयाने तात्‍पुरता अटकपूर्व जामीन मंजूर केला असल्याची माहिती सूत्रांनी दिली. हे दोघेही फरारी होते. पाखरे सध्या न्यायालयीन कोठडीत आहे.