काँग्रेस नगरसेवकाची न.प. अभियंत्याला मारहाण; मलकापुरातील घटना; पोलीस ठाण्यात कर्मचाऱ्यांचा ठिय्या

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः मलकापूर नगर परिषदेचे नगरसेवक तथा स्थायी समिती सदस्य सनाउल्लाखाँ जमादार यांनी पाणीपुरवठा अभियंता निनाद आचार्य यांना मारहाण केल्याची घटना आज, 25 मे रोजी दुपारी घडली. या प्रकारामुळे नगरपरिषदेचे कर्मचारी संतप्त झाले. त्यांनी कामबंद आंदोलन पुकारात मलकापूर पोलीस ठाण्याच्या आवारात ठिय्या दिला होता. अखेर आचार्य यांनी दिलेल्या तक्रारीवरून नगरसेवकाविरोधात गुन्हा दाखल …
 

बुलडाणा (बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा)  ः मलकापूर नगर परिषदेचे नगरसेवक तथा स्थायी समिती सदस्य सनाउल्लाखाँ जमादार यांनी पाणीपुरवठा अभियंता निनाद आचार्य यांना मारहाण केल्याची घटना आज, 25 मे रोजी दुपारी घडली. या प्रकारामुळे नगरपरिषदेचे कर्मचारी संतप्त झाले. त्यांनी कामबंद आंदोलन पुकारात मलकापूर पोलीस ठाण्याच्या आवारात ठिय्या दिला होता. अखेर आचार्य यांनी दिलेल्या तक्रारीवरून नगरसेवकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

नक्‍की काय घडले?

आज सकाळी 11 वाजता नगर परिषदेच्या स्थायी समितीची बैठक होती. बैठक आटोपल्यानंतर सर्व कर्मचारी हजर असताना नगरसेवक सनाउल्लाखाँ जमादार तिथे आले. त्यांनी पाणीपुरवठा अभियंत्यांना सालीपुरा प्रभागातील पाईपलाईनचे काम पूर्ण झाले असल्याचा प्रस्ताव पाठवायला सांगितले. त्यावेळी अभियंत्यांनी अजून  काम अपूर्ण असल्याने पूर्ण झाल्याचा प्रस्ताव पाठवता येणार नाही, असे सांगितले. त्‍यामुळे चिडलेल्या नगरसेवकाने सर्वांसमक्ष अभियंत्यांना मारहाण व शिवीगाळ केली, अशी आचार्य यांनी तक्रारीत म्‍हटले आहे.