कर्तव्यदक्ष एसपींनी केला महासंचालक पदक घोषित पोलिसांचा सत्‍कार

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः जिल्हा पोलीस दलातील 4 पोलिसांना महासंचालक पदक जाहीर झालेले असून, यात शेगाव ग्रामीणचे सहायक पोलीस निरिक्षक गोकूळ सूर्यवंशी, पोलीस हवालदार राजू जवंजाळ, पोलीस हवालदार अविनाश भांबळे (एसीबी), पोलीस नायक गजानन आहेर यांचा समावेश आहे. याबद्दल या सर्वांचा महाराष्ट्र दिनी कर्तव्यदक्ष जिल्हा पोलीस अधीक्षक अरविंद चावरिया यांनी पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला. …
 

बुलडाणा (बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः जिल्हा पोलीस दलातील 4 पोलिसांना महासंचालक पदक जाहीर झालेले असून, यात शेगाव ग्रामीणचे सहायक पोलीस निरिक्षक गोकूळ सूर्यवंशी, पोलीस हवालदार राजू जवंजाळ, पोलीस हवालदार अविनाश भांबळे (एसीबी), पोलीस नायक गजानन आहेर यांचा समावेश आहे. याबद्दल या सर्वांचा महाराष्ट्र दिनी कर्तव्‍यदक्ष जिल्हा पोलीस अधीक्षक अरविंद चावरिया यांनी पुष्पगुच्‍छ देऊन सत्‍कार केला. यावेळी अप्पर पोलीस अधीक्षक बजरंग बनसोडे, उपविभागीय पोलीस अधिकारी रमेश बरकते, स्‍थानिक गुन्‍हे शाखा प्रमुख बळीराम गिते, बुलडाणा शहर ठाणेदार  प्रदीप साळुंखे यांची उपस्‍थिती होती. पदकपात्र पोलिसांचा अन्य पोलिसांनीही आदर्श घेऊन गुणवत्तापूर्ण कामगिरी करावी, असे प्रतिपादन यावेळी श्री. चावरिया यांनी केले.