कर्जबाजारी शेतकऱ्याची आत्‍महत्‍या; शेगाव तालुक्‍यातील घटना

जलंब (संतोष देठे पाटील ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः कर्जबाजारीपणाला कंटाळून 60 वर्षीय शेतकऱ्याने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना 10 जूनच्या सकाळी पहुरजिरा (ता. शेगाव) येथे समोर आली. महादेव किसन बेलोकार (60) असे आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याचे नाव आहे. त्यांनी विदर्भ कोकण बँकेकडून कर्ज घेतले होते. मात्र सततची नापिकी आणि कर्जबाजारीपणामुळे त्यांना नैराश्य येऊन …
 

जलंब (संतोष देठे पाटील ः बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः कर्जबाजारीपणाला कंटाळून 60 वर्षीय शेतकऱ्याने राहत्‍या घरात गळफास घेऊन आत्‍महत्‍या केल्याची घटना 10 जूनच्‍या सकाळी पहुरजिरा (ता. शेगाव) येथे समोर आली.

महादेव किसन बेलोकार (60) असे आत्‍महत्‍या केलेल्या शेतकऱ्याचे नाव आहे. त्‍यांनी विदर्भ कोकण बँकेकडून कर्ज घेतले होते. मात्र सततची नापिकी आणि कर्जबाजारीपणामुळे त्‍यांना नैराश्य येऊन त्‍यांनी टोकाचे पाऊल उचलले. घटनेची माहिती मिळताच जलंब पोलिसांनी घटनास्‍थळ गाठून पंचनामा केला व मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठवला. तपास पोहेकाँ सुपडसिंग चव्‍हाण करत आहेत.