आनंदा वाघमारे झाले एएसआय!; सेवेतील प्रामाणिकपणाला पोलीस अधीक्षकांनी दिले न्यू इयर गिफ्ट!

खामगाव (ज्ञानेश्वर ताकोते ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः खामगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात कार्यरत हेड कॉन्स्टेबल आनंदा वाघमारे यांची सहाय्यक पोलीस उपनिरीक्षकपदी पदोन्नती झाली आहे. कर्तव्यदक्ष पोलीस अधीक्षक अरविंद चावरिया यांनी त्यांना नव्या वर्षाचे हे गिफ्ट दिले. श्री. वाघमारे यांच्या पोलिस खात्यातील आजपर्यंतच्या कार्याची दखल त्यासाठी घेतली.श्री. वाघमारे यांनी 1994 मध्ये पोलीस खात्यात दाखल होत जळगाव …
 

खामगाव (ज्ञानेश्‍वर ताकोते ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः खामगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात कार्यरत हेड कॉन्स्टेबल आनंदा वाघमारे यांची सहाय्यक पोलीस उपनिरीक्षकपदी पदोन्नती  झाली आहे. कर्तव्यदक्ष पोलीस अधीक्षक अरविंद चावरिया यांनी त्यांना नव्या वर्षाचे हे गिफ्ट दिले.

श्री. वाघमारे यांच्या पोलिस खात्यातील आजपर्यंतच्या कार्याची दखल त्यासाठी घेतली.श्री. वाघमारे यांनी 1994 मध्ये पोलीस खात्यात दाखल होत जळगाव जामोद, शेगावसारख्या पोलीस स्टेशनमध्ये आपली अविरत सेवा देऊन प्रामाणिकपणे पोलीस खात्यात ड्युटी केली आहे. मागील चार वर्षापासून खामगाव ग्रामीण पोलीस स्टेशनला प्रामाणिकपणे पोलीस कॉन्स्टेबल या पदावर ते कार्यरत होते. पोलीस खात्यातही श्री. वाघमारे यांची एक प्रामाणिक कर्मचारी म्हणून ओळख आहे. पदोन्नती मिळाल्याबद्दल अनेक स्तरातून त्यांचे कौतुक होत आहे.