आधी मुलांना मारहाण केली, नंतर ४२ वर्षीय व्यक्तीचा गळफास; खामगाव तालुक्यातील धक्‍कादायक घटना

खामगाव (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः ४२ वर्षीय व्यक्तीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना आज, १२ ऑगस्टला सकाळी सव्वानऊच्या सुमारास कदमापूर (ता. खामगाव) येथे उघडकीस आली. नारायण दयाराम सोळंके (रा. कदमापूर) असे आत्महत्या केलेल्या व्यक्तीचे नाव आहे. भावसिंग किसन पवार (रा. कदमापूर) यांनी खामगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात दिलेल्या माहितीनुसार आज सकाळी कदमापूर रोडवर नारायण सोळंके हा …
 
आधी मुलांना मारहाण केली, नंतर ४२ वर्षीय व्यक्तीचा गळफास; खामगाव तालुक्यातील धक्‍कादायक घटना

खामगाव (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः ४२ वर्षीय व्यक्तीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना आज, १२ ऑगस्टला सकाळी सव्वानऊच्‍या सुमारास कदमापूर (ता. खामगाव) येथे उघडकीस आली. नारायण दयाराम सोळंके (रा. कदमापूर) असे आत्महत्या केलेल्या व्यक्तीचे नाव आहे.

भावसिंग किसन पवार (रा. कदमापूर) यांनी खामगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात दिलेल्या माहितीनुसार आज सकाळी कदमापूर रोडवर नारायण सोळंके हा दारू पिऊन त्याच्‍या दोन लहान मुलांना मारहाण करत होता. तेव्हा भावसिंग पवार यांनी लहान मुलांना ऑटोत बसवून त्यांच्‍या घरी सोडून दिले. पुन्हा रस्त्यावर येऊन पहिले असता कदमापूर शिवारातील दत्तात्रय चिंचोळकर यांच्या शेतातील निंबाच्या झाडाला नारायण गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसून आला. खामगाव ग्रामीण पोलिसांना घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला.