आधी कापली होती नस; नंतर घेतला गळफास; दोन दिवसांपूर्वीच झाला होता साक्षगंध! बुलडाणा शहरातील घटना

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः राहत्या घरातच 19 वर्षीय तरुणीने ओढणीच्या साह्याने गळफास घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केला. तिला तातडीने जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र त्याआधीच तिचा मृत्यू झाला होता. ही घटना सुंदरखेड येथे आज, 9 मार्चला दुपारी 12:30 च्या सुमारास घडली. ओढणीने गळफास घेण्यापूर्वी तिने हाताची नस सुद्धा कापण्याचा प्रयत्न केल्याचे समोर आले आहे. …
 

बुलडाणा (बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः राहत्या घरातच 19 वर्षीय तरुणीने ओढणीच्‍या साह्याने गळफास घेऊन आत्महत्येचा प्रयत्‍न केला. तिला तातडीने जिल्‍हा रुग्‍णालयात दाखल करण्यात आले. मात्र त्‍याआधीच तिचा मृत्‍यू झाला होता. ही घटना सुंदरखेड येथे आज, 9 मार्चला दुपारी 12:30 च्या सुमारास घडली. ओढणीने गळफास घेण्यापूर्वी तिने हाताची नस सुद्धा कापण्याचा प्रयत्न केल्याचे समोर आले आहे. तसेच तिचा दोन दिवसांपूर्वीच साक्षगंध झाला होता. नयना गजानन जाधव (रा. सुंदरखेड, ता. जि. बुलडाणा) असे या युवतीचे नाव आहे. तिचा मृत्यू गळफास घेतल्यानेच झाला की अन्य कुठल्या कारणाने हे उत्तरीय तपासणीचा अहवाल आल्यावरच निष्पन्‍न होईल, असे तपास अधिकारी पोहेकाँ प्रशांत शास्त्री यांनी सांगितले.