आणखी ३ ठिकाणी चोरट्यांनी केला हात साफ, बुलडाण्यात थांबेनात चोऱ्या!

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा)ः बुलडाणा शहरात चोरीच्या घटना वाढतच असून, काल, 21 फेब्रुवारीलाही धाड नाका परिसर आणि मच्छि ले आऊटमध्ये ३ ठिकाणी चोरट्यांनी हात साफ केले. पहिली घटना ः धाड नाका परिसरातील रहिवासी शेख शाकीब शेख हबीब यांच्या घरी कुणी नसल्याची संधी साधून चोरट्यांनी 12 ग्रॅम सोन्याचा नेकलेस चोरून नेला.दुसरी घटना ः मच्छि ले आऊटमध्ये …
 

बुलडाणा (बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा)ः बुलडाणा शहरात चोरीच्‍या घटना वाढतच असून, काल, 21 फेब्रुवारीलाही धाड नाका परिसर आणि मच्‍छि ले आऊटमध्ये ३ ठिकाणी चोरट्यांनी हात साफ केले.

  • पहिली घटना ः धाड नाका परिसरातील रहिवासी शेख शाकीब शेख हबीब यांच्‍या घरी कुणी नसल्याची संधी साधून चोरट्यांनी 12 ग्रॅम सोन्‍याचा नेकलेस चोरून नेला.
  • दुसरी घटना ः मच्‍छि ले आऊटमध्ये जगदीश जयराम जोरवर हे घरी नसल्याची संधी साधून नगदी ९ हजार रुपये चोरून नेले.
  • तिसरी घटना ः मच्‍छि ले आऊटमध्येच हमीद मियॉ बेग मिर्झा यांच्‍या घरात बळीराजा टॉर्चचे गोडाऊन आहे. यासाठी शेखर बळी आणि त्‍यांचे अभियंता शेख वसीम यांनी त्‍यांच्‍या तीन खोल्‍या भाड्याने घेतल्या आहेत.20 फेब्रुवारीला सायंकाळी गोडावून बंद करून शेख वसीम दुसऱ्या दिवशी लग्‍नासाठी बाहेरगावी गेले होते. काल सायंकाळी परतले असता गोडावून फोडलेले आढळले. गल्‍ल्‍यातील 25 हजार रुपये गायब असल्याचे दिसून आले.

बाहेरगावी जाताय?

बंद घरे प्रामुख्याने चोरटे लक्ष करत आहेत. त्‍यामुळे बाहेरगावी जाण्याआधी नागरिकांनी पोलिसांना कल्‍पना देण्याची गरज आहे किंवा योग्‍य ती खबरदारी घेण्याची गरज आहे.