अटाळीत समोर आले तिहेरी तलाकचे प्रकरण; मूलबाळ होत नाही म्हणून फोनवरूनच म्हटला, तलाक तलाक तलाक!

खामगाव (भागवत राऊत ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः खामगाव तालुक्यातील अटाळी येथे तिहेरी तलाकचे प्रकरण समोर आले असून, मूलबाळ होत नाही म्हणून फोनवरूनच पतीने 24 वर्षीय विवाहितेचा तलाक तलाक तलाक म्हणत तलाक दिला. विवाहितेने खामगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली आहे. नर्सिंग परवीन मुमताज खाँ (रा. अटाळी) हिने तक्रारीत म्हटले आहे, की तुला …
 

खामगाव (भागवत राऊत ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः खामगाव तालुक्यातील अटाळी येथे तिहेरी तलाकचे प्रकरण समोर आले असून, मूलबाळ होत नाही म्हणून फोनवरूनच पतीने 24 वर्षीय विवाहितेचा तलाक तलाक तलाक म्हणत तलाक दिला. विवाहितेने खामगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली आहे.

नर्सिंग परवीन मुमताज खाँ (रा. अटाळी) हिने तक्रारीत म्हटले आहे, की तुला कामधंदा येत नाही. तुला आजारामुळे मूलबाळ होत नाहीत असे म्हणून सासरच्यांनी शारीरिक व मानसिक छळ केला. चापटबुक्क्यांनी मारहाण केली. पतीने फोनवरूनच तलाक दिला. या तक्रारीवरून पोलिसांनी पती मुमताज खाँ रहीम खाँ, सासरा रहीम खाँ इब्राहिम खाँ, सासू शमीम बी रहीम खाँ, दीर नाजीम खाँ रहीम खाँ, अजीम खाँ रहीम खाँ, अमजद खाँ रहीम खाँ (सर्व रा. धोत्रा भनगोजी, ता. चिखली) व मुन्नीबी हबीब खाँ (रा. सैलानीनगर, चिखली) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. तपास पोहेकाँ सुनील राऊत करत आहेत. तक्रार एएसआय आनंद वाघमारे यांनी दाखल करून घेतली.