अज्ञात वाहनाच्‍या धडकेने दुचाकीस्वार तरुण जागीच ठार; दूध घेऊन जात होता…; देऊळगाव राजा तालुक्‍यातील घटना

देऊळगाव राजा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः देउळगावराजा सहकारी दूध उत्पादन संस्थेत दूध घालण्यासाठी जाताना अज्ञात वाहनाने उडवल्याने दुचाकीस्वार तरुण जागीच ठार झाला. ही घटना आज, 2 जुलैला सकाळी साडेसातच्या सुमारास जालना – देऊळगावराजा रोडवरील मधुबन हॉटेलसमोर घडली. प्रभाकर टेकाळे (22, सावखेड भोई, ता. देऊळगाव राजा) असे ठार झालेल्याचे नाव आहे. प्रभाकरच्या दुचाकीला (क्र. एमएच २८ …
 
अज्ञात वाहनाच्‍या धडकेने दुचाकीस्वार तरुण जागीच ठार; दूध घेऊन जात होता…; देऊळगाव राजा तालुक्‍यातील घटना

देऊळगाव राजा (बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः देउळगावराजा सहकारी दूध उत्पादन संस्थेत दूध घालण्यासाठी जाताना अज्ञात वाहनाने उडवल्याने दुचाकीस्वार तरुण जागीच ठार झाला. ही घटना आज, 2 जुलैला सकाळी साडेसातच्‍या सुमारास जालना – देऊळगावराजा रोडवरील मधुबन हॉटेलसमोर घडली.

प्रभाकर टेकाळे (22, सावखेड भोई, ता. देऊळगाव राजा) असे ठार झालेल्याचे नाव आहे. प्रभाकरच्‍या दुचाकीला (क्र. एमएच २८ बीएफ ५०२१) अज्ञात वाहनाने मागून उडवले. यात त्याचा जागीच मृत्यू झाला.  याप्रकरणी गजानन तुळशीराम टेकाळे यांनी देऊळगाव राजा पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्‍यावरून अज्ञात वाहन चालकाविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोहेकाँ गजानन केदार करत आहेत.