अंगावर पेट्रोल टाकून माचिसची काडी पेटवून फेकली अंगावर!; दोघांचा प्रताप, युवकाला जीवंत जाळण्याचा प्रयत्‍न, किनगाव राजा येथील थरार

किनगावराजा (नीलेश डिघोळे ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः किनगाव राजा (ता. सिंदखेड राजा) येथील बसथांब्यावर दारू पिण्याच्या कारणावरून तिघांत भांडण होऊन त्यातील संदीप बाबुराव निकाळजे यास पेट्रोल टाकून जिवंत जाळण्याचा प्रयत्न झाला. ही खळबळजनक घटना काल, २० जूनला दुपारी दीडच्या सुमारास घडली. महाराष्ट्र बँकेच्या शाखेसमोर घटना घडली. संदीपचे विजय श्रीराम मुंढे, किरण ऊर्फ गोकुळ रामभाऊ …
 

किनगावराजा (नीलेश डिघोळे ः बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः किनगाव राजा (ता. सिंदखेड राजा) येथील बसथांब्‍यावर दारू पिण्याच्या कारणावरून तिघांत भांडण होऊन त्‍यातील संदीप बाबुराव निकाळजे यास पेट्रोल टाकून जिवंत जाळण्याचा प्रयत्न झाला. ही खळबळजनक घटना काल, २० जूनला दुपारी दीडच्‍या सुमारास घडली.

महाराष्ट्र बँकेच्‍या शाखेसमोर घटना घडली. संदीपचे विजय श्रीराम मुंढे, किरण ऊर्फ गोकुळ रामभाऊ उबाळे (तिघेही रा. किनगावराजा) या दोघांशी दारू पिण्याच्या कारणावरून भांडण केले. भांडण इतके विकोपाला गेले की, विजय व गोकुळने संदीपच्‍या मागून अंगावर पेट्रोल टाकले. पेट्रोल थंड लागल्याने मागे वळून पाहिले असता विजयने माचिसची काडी पेटवून संदीपच्‍या अंगावर टाकली.

संदीपच्या अंगावरील टीशर्ट पेटून त्याच्या दोन्ही हाताला, पोटाला, छातीवर, चेहऱ्यावर तसेच कानाला भाजल्यामुळे गंभीर जखमा झाल्या आहेत. संदीपची आई सौ. सत्यभामा बाबुराव निकाळजे (५०, रा. किनगावराजा) यांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास ठाणेदार सोमनाथ पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक रमेश बनसोडे, हेड कॉन्स्टेबल राजू दराडे, गजानन सानप, रोशन परशुवाले, जाकेर चौधरी, जाकेर पठाण करत आहेत.