सागवान येथील 44 वर्षीय व्‍यक्‍ती बेपत्ता

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः सागवान (ता. बुलडाणा) येथील 44 वर्षीय व्यक्ती 1 एप्रिलपासून बेपत्ता आहे. अद्याप न सापडल्याने बुलडाणा शहर पोलीस ठाण्यात हरवल्याची तक्रार देण्यात आली. राजू देवराव काळे असे या व्यक्तीचे नाव आहे. तो वेडसर स्वभावाचा असून, घरात कुणाला काही न सांगता निघून गेला आहे. आकाश जैन यांनी या प्रकरणात शहर पोलिसांत तक्रार …
 

बुलडाणा (बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः सागवान  (ता. बुलडाणा) येथील 44 वर्षीय व्‍यक्‍ती 1 एप्रिलपासून बेपत्ता आहे. अद्याप न सापडल्‍याने बुलडाणा शहर पोलीस ठाण्यात हरवल्याची तक्रार देण्यात आली. राजू देवराव काळे असे या व्‍यक्‍तीचे नाव आहे. तो वेडसर स्‍वभावाचा असून, घरात कुणाला काही न सांगता निघून गेला आहे. आकाश जैन यांनी या प्रकरणात शहर पोलिसांत तक्रार दिली.