माझ्या बायकोशी फोनवर का बोलतो म्हणून दिली होती धमकी; युवकाच्या आत्महत्येप्रकरणी ५ जणांविरोधात गुन्हा दाखल

मेहकर (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः माझ्या बायकोशी फोनवर का बोलतो, असे म्हणत काटा काढण्याची व समाजात बदनामी करण्याची धमकी दिल्यानेच माझ्या मुलाने गळफास घेऊन आत्महत्या केली, अशी तक्रार काल, १२ जुलैला मृतक युवकाच्या वडिलांनी जानेफळ पोलीस ठाण्यात दिली. तक्रारीवरून पोलिसांनी आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी देऊळगाव साकर्शा येथील पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. देऊळगाव साकर्शा (ता. …
 

मेहकर (बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः माझ्या बायकोशी फोनवर का बोलतो, असे म्हणत काटा काढण्याची व समाजात बदनामी करण्याची धमकी दिल्यानेच माझ्या मुलाने गळफास घेऊन आत्महत्या केली, अशी तक्रार काल, १२ जुलैला मृतक युवकाच्‍या वडिलांनी जानेफळ पोलीस ठाण्यात दिली. तक्रारीवरून पोलिसांनी आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी देऊळगाव साकर्शा येथील पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

देऊळगाव साकर्शा (ता. मेहकर) येथील मिलिंद बाळू जाधव याने स्वतःच्या शेतात निंबाच्या झाडाला गळफास घेऊन १० जुलैला सायंकाळी आत्‍महत्‍या केली होती. त्याचे व्हिडिओ चित्रिकरण करून स्टेटसलाही ठेवले होते. याप्रकरणी जानेफळ पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली होती. काल, १२ जुलैला मिलिंदचे वडील राजू ऊर्फ बाळू सूर्यभान जाधव (५०) यांनी जानेफळ पोलीस ठाण्यात येऊन तक्रार दिली की, कुवरसिंग जयसिंग चव्हाण (रा. देऊळगाव साकर्शा) याने माझ्या पत्नीसोबत तू फोनवर का बोलतो, असे म्हणत धमक्या दिल्या होत्या. कुवरसिंग चव्हाण, शिवानंद सुभाष पवार, पंकज जानकिराम चव्हाण, किशोर ऊर्फ तिरथ देवीचंद पवार, सुखदेव ऊर्फ चिकू जगाराम पवार यांनी मिलिंदला काटा काढण्याची व जीवे मारण्याची धमकी दिली होती. त्यांनी मिलिंदला आत्महत्येस प्रवृत्त केल्यानेच मिलिंदने आत्महत्या केली, असे तक्रारीत म्हटले आहे. तक्रारीवरून कुवरसिंग जयसिंग चव्हाण,शिवानंद सुभाष पवार ,पंकज जानकिराम चव्हाण,किशोर उर्फ तिरथ देवीचंद पवार,सुखदेव उर्फ चिकू जगाराम पवार अशा ५ जणांविरुद्ध जानेफळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.