भोन येथील डोहात बुडून मजुराचा मृत्‍यू; संग्रामपूर तालुक्‍यातील घटना

संग्रामपूर (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः संग्रामपूर तालुक्यातील भोन येथील ४२ वर्षीय मजुराचा पूर्णा नदीच्या डोंग्याच्या पेंड डोहात बुडून मृत्यू झाला. ही घटना काल, १६ ऑगस्टला दुपारी दोनच्या सुमारास घडली. प्रकाश किसन भामद्रे (रा. भोन) असे मृतकाचे नाव आहे. प्रकाश भामद्रे हे पुर्णेच्या काठा पलीकडे खातखेड शिवारात लिंगेश्वर मंदिर परिसरात जनार्दन बोंद्रे यांच्या शेतात निंदणीसाठी गेले …
 
भोन येथील डोहात बुडून मजुराचा मृत्‍यू; संग्रामपूर तालुक्‍यातील घटना

संग्रामपूर (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः संग्रामपूर तालुक्यातील भोन येथील ४२ वर्षीय मजुराचा पूर्णा नदीच्या डोंग्याच्या पेंड डोहात बुडून मृत्यू झाला. ही घटना काल, १६ ऑगस्‍टला दुपारी दोनच्‍या सुमारास घडली.

प्रकाश किसन भामद्रे (रा. भोन) असे मृतकाचे नाव आहे. प्रकाश भामद्रे हे पुर्णेच्या काठा पलीकडे खातखेड शिवारात लिंगेश्वर मंदिर परिसरात जनार्दन बोंद्रे यांच्या शेतात निंदणीसाठी गेले होते. शेतातील काम झाल्यानंतर पूर्णा नदी पात्रातुन खोल पाण्याचा अंदाज न आल्याने पाण्याच्या प्रवाहात डोंग्याचा पेंन्ड डोहात ते बुडाले. पूर्णा नदी पात्रातुन खातखेड येथून रेती उपसा करणाऱ्या मजुरांच्या ही बाब निदर्शनास येताच त्‍यांनी आरडाओरड केली. भामद्रेला वाचविण्यासाठी शोध घेतला. चुलतभाऊ गजानन भामद्रे यांनी शर्थीचे प्रयत्न केले. मात्र ते प्रकाशला वाचवू शकले नाहीत. तामगाव पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली असून, तपास ठाणेदार श्री. गावंडे यांच्या मार्गदर्शनाखाली बीट जमादार श्री. मेहेश्रे करत आहेत.
डोंगा झाला शोभेची वस्तू
भोन येथील बहुतांश शेतकऱ्यांची शेती पुर्णा नदी पलीकडे खातखेड भोन शिवारात असून मजूर वर्ग व शेतकऱ्यांसाठी पुर्णा नदीतून येजा करण्यासाठी शासनाकडून डोंगा उपलब्ध करून देण्यात आला. मात्र डोंगा बंद असून शोभेची वस्तू बनली आहे. डोंगा सुरू असता तर कदाचित मजूर प्रकाशचा जीव वाचला असता. पत्नी विधवा व मुले अनाथ झाले नसते. शेतकरी, मजूर वर्गासाठी पुर्णा नदीपात्रातून येजा करण्यासाठी डोंगा सुरू करणे गरजेचे आहे.