कडक लॉकडाऊनमध्ये मशिदीतून 80 ते 90 जण नमाज पठण करून पडले बाहेर, अनेकांच्‍या तोंडाला नव्‍हता मास्‍क, शेगावमध्ये गुन्‍हा दाखल

शेगाव (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः जिल्ह्यात कडक लॉकडाऊन असताना रमजान ईदच्या दिवशी सकाळी शेगाव शहरातील अळसणा रोडवरील आझादनगरातील मेहमुदिया मशिदीतून 80 ते 90 जण नमाज पठण करून बाहेर पडले. यातील अनेकांच्या तोंडाला मास्कही नव्हता. या प्रकरणी शेगाव शहर पोलिसांनी मशिदीच्या अध्यक्षासह आणखी एकाविरुद्ध काल, 15 मे रोजी गुन्हा दाखल केला आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव बघता जिल्ह्यात …
 

शेगाव (बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः जिल्ह्यात कडक लॉकडाऊन असताना रमजान ईदच्‍या दिवशी सकाळी शेगाव शहरातील अळसणा रोडवरील आझादनगरातील मेहमुदिया मशिदीतून 80 ते 90 जण नमाज पठण करून बाहेर पडले. यातील अनेकांच्‍या तोंडाला मास्‍कही नव्‍हता. या प्रकरणी शेगाव शहर पोलिसांनी मशिदीच्‍या अध्यक्षासह आणखी एकाविरुद्ध काल, 15 मे रोजी गुन्‍हा दाखल केला आहे.

कोरोनाचा प्रादुर्भाव बघता जिल्ह्यात 10 दिवसांचा कडक लॉकडाऊन जिल्हाधिकाऱ्यांनी घोषित केलेला आहे. यात सामाजिक, धार्मिक, राजकीय आणि सांस्कृतिक कार्यक्रमांवर बंदी घातलेली आहे. असे असतानाही मेहमुदिया मशिदीत 80 ते 90 जण एकत्र आले होते. कायदा व सुव्यस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून तात्काळ कारवाई न करता काल पोलिसांनी गुन्‍हे दाखल केले. पेट्रोलिंग दरम्‍यान पोलिसांना ही बाब लक्षात आली.  या प्रकरणी पोलीस उपनिरिक्षक नितीन हरिभाऊ इंगोले यांच्‍या तक्रारीवरून जमीया अर्बीया दारुल उलुम बहुउद्देशीय संस्थेअंतर्गत चालणाऱ्या मेहमुदिया मशिदीचे अध्यक्ष  मोहम्मद नइम उर्फ रहेमान अब्दुल कयुम (46) व शेख सलीम शेख शकूर (32, दोघे रा. आझादनगर, शेगाव) यांच्‍याविरुद्ध गुन्‍हा दाखल करण्यात आला.