राजेगावच्या महिलेचा कोरोनाने मृत्यू; दिवसभरात 79 नवे पॉझिटिव्ह
बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः जिल्ह्यात आज, 12 फेब्रुवारीला कोरोनाने आणखी एकाचा बळी घेतला. राजेगाव (ता. सिंदखेड राजा) येथील 65 वर्षीय महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. दरम्यान दिवसभरात नव्या 79 पॉझिटिव्ह रुग्णांची भर पडली असून, 58 रुग्ण बरे झाल्याने त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला आहे.
प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविलेल्या व रॅपिड अँटिजेन टेस्ट किटद्वारे तपासलेल्या अहवालांपैकी एकूण 587 अहवाल प्राप्त झाले आहेत. यापैकी 508 अहवाल कोरोना निगेटिव्ह असून 79 अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त आले आहेत. प्राप्त पॉझिटिव्ह अहवालांमध्ये प्रयोगशाळेतील 57 व रॅपिड अँटिजेन टेस्टमधील 22 अहवालांचा समावेश आहे. निगेटिव्ह अहवालामध्ये प्रयोगशाळेतील 425 तर रॅपिड टेस्टमधील 83 अहवालांचा समावेश आहे.
पॉझिटिव्ह आलेले अहवाल
चिखली शहर : 18, चिखली तालुका : अंचरवाडी 2, शेलूद 1, पिंपळगाव 1, जांभोरा 1, किन्होळा 1, भालगाव 1, देऊळगाव राजा शहर : 9, देऊळगाव राजा तालुका : गिरोली बुद्रूक 1, लिंबा 1, गारखेडा 1, गारगुंडी 1, आळंद 1, सिंदखेड राजा शहर : 1, सिंदखेड राजा तालुका : साखरखेर्डा 1, मलकापूर पांग्रा 1, मोहाडी 1, राजेगाव 1, मेहकर तालुका : हिवरा खुर्द 1, लोणार शहर : 1, बुलडाणा तालुका : सुंदरखेड 2, रूईखेड 1, सागवन 1, वरवंड 2, बुलडाणा शहर : 17, जळगांव जामोद शहर : 1, जळगाव जामोद तालुका : वाडी 1, खामगाव शहर : 1, खामगाव तालुका : घाटपुरी 1, दोंदवडा 1, मलकापूर शहर : 3, नांदुरा शहर : 1, मूळ पत्ता जाफ्राबाद जि. जालना 1 अशाप्रकारे जिल्ह्यात 79 रुग्ण आढळले आहे.
58 रुग्णांनी केली कोरोनावर मात
आज 58 रुग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुटी देण्यात आली आहे. विविध तालुक्यांतील कोविड केअर सेंटरनुसार सुटी देण्यात आलेले रुग्ण असे ः खामगाव : 14, चिखली : 1, देऊळगाव राजा : 12, बुलडाणा : स्त्री रुग्णालय 8, अपंग विद्यालय 3, लोणार : 7, शेगाव : 2, चिखली : 9, मेहकर : 2.
427 कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार सुरू
आजपर्यंत 114524 रिपोर्ट निगेटिव्ह प्राप्त झाले आहेत. त्याचप्रमाणे आजपर्यंत 14012 कोरोनाबाधीत रुग्ण कोरोना निगेटिव्ह असल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुटी देण्यात आली आहे. तसेच 812 स्वॅब नमुने कोविड चाचणीसाठी घेण्यात आले आहेत. जिल्ह्यात आज अखेर एकूण 14614 कोरोनाबाधित रुग्ण असून, सध्या रुग्णालयात 427 कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तसेच आजपर्यंत 175 कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकार्यांनी दिली आहे.