मलकापूरमध्ये पुन्हा उद्रेक! 24 तासांत 141 पॉझिटिव्ह!! 2 तालुक्यांचीही सेंच्युरी, शेगावात उसळी, जिल्हा सव्वापाचशेच्या पल्याड!

बुलडाणा (विशेष प्रतिनिधी : बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः जिल्ह्यात कालच्या तुलनेत आज, 15 मार्चला कमी रुग्ण निघाले असले तरी हा आकडा साडेपाचशेच्या घरात पोहोचलाय! मात्र 3 तालुक्यांची रुग्णसंख्या शतकपार पोहोचली असून, शेगावमध्ये कोरोनाने पुन्हा उसळी घेतल्याचे धक्कादायक तितकेच धोकादायक चित्र आहे.शनिवारी व रविवारी कर्फ्यू लावण्याचा निर्णय ‘वरून’ आलेल्या फोनमुळे मागे घेणे व नागरिकांची बेफिकिरी जिल्ह्यासाठी …
 

बुलडाणा (विशेष प्रतिनिधी : बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः जिल्ह्यात कालच्‍या तुलनेत आज, 15 मार्चला कमी रुग्ण निघाले असले तरी हा आकडा साडेपाचशेच्या घरात पोहोचलाय! मात्र 3 तालुक्यांची रुग्णसंख्या शतकपार पोहोचली असून, शेगावमध्ये कोरोनाने पुन्हा उसळी घेतल्याचे धक्कादायक तितकेच धोकादायक चित्र आहे.
शनिवारी व रविवारी कर्फ्यू लावण्याचा निर्णय ‘वरून’ आलेल्या फोनमुळे मागे घेणे व नागरिकांची बेफिकिरी जिल्ह्यासाठी चांगलीच महागात पडलीय! 14 मार्चला पॉझिटिव्हचा आकडा 661 पर्यंत गेला. यापाठोपाठ आज हा आकडा 533 वर स्थिरावला! मागील काही दिवसांपासून नियंत्रणात असलेल्या मलकापूर तालुक्यात कोरोनाचा पुन्हा विस्फोट झाला असून, 24 तासांतच 141 रुग्ण आढळल्याने मागील वर्षी दीर्घकाळ हॉट स्पॉट राहिलेल्या मलकापूरचा हा आकडा धोक्याची घंटा ठरणार अशी चिन्हे आहेत. यापाठोपाठ जिल्हा मुख्यालयाचा केंद्रबिंदू असलेल्या बुलडाणा तालुक्यात तब्बल सव्वाशे पॉझिटिव्ह निघाले आहेत. काही दिवसांपासून दुहेरी आकड्यात खेळणाऱ्या खामगावने तिहेरी संख्या ओलांडून 109 चा आकडा गाठलाय! परिणामी या 3 तालुक्यांतील कोरोनाचे संकट गहिरे झाले आहे. शेगाव तालुकाही यात मागे नसून 24 तासांत या तालुक्याने नाबाद 79 असा स्कोअर दिला आहे. यामुळे हे तालुके जिल्हा प्रशासनासाठी डोकेदुखी तर आरोग्य यंत्रणेसाठी कडवे आव्हान ठरण्याच्या बेतात आहेत.
चिखली, देऊळगावमध्ये घट
उद्रेकात दीर्घ काळ’टॉप फाईव्ह’मध्ये असलेल्या चिखली (30 रुग्ण) व देऊळगाव राजा (10 रुग्‍ण) मधील रुग्णात घट झाल्याचे दिलासादायक चित्र आहे. मोताळा तालुक्यात 29 पॉझिटिव्ह आढळले असले तरी तालुका नियंत्रणात आहे. सिंदखेड राजा (14), जळगाव जामोद (6), संग्रामपूर (9), मेहकर (2), लोणार (6) हे तालुकेही आटोक्यात आहेत. नांदुरा एकदम नील निघणे सुखद आश्चर्य ठरावे. यामुळे गत 24 तास जिल्ह्यासाठी संमिश्र ठरलेत. मात्र उद्याचे काय हा प्रश्न कायम व तूर्तास अनुत्तरित आहे.