बाप्पा, आकडा वाढला नं… दिवसभरात 70 कोरोना पॉझिटिव्ह!; बुलडाणा शहरातच तब्बल 19 रुग्ण!!
बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः जिल्ह्यात आज, 18 जानेवारीला आढळलेला कोरोनाबाधितांचा आकडा धक्का देणाराच म्हणावा. कारण गेल्या काही दिवसांत बाधितांत घट झाली असून, आज पुन्हा हृदयाचा ठोका कोरोनाने चुकवला आहे. दिवसभरात तब्बल 70 पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत. यात तब्बल 19 रुग्ण एकट्या बुलडाणा शहरातील आहेत.
प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविलेल्या व रॅपिड अँटिजेन टेस्ट किटद्वारे तपासलेल्या अहवालांपैकी एकूण 388 अहवाल प्राप्त झाले आहेत. यापैकी 318 अहवाल कोरोना निगेटिव्ह असून 70 अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त आले आहे. प्राप्त पॉझिटिव्ह अहवालांमध्ये प्रयोगशाळेतील 69 व रॅपीड अँटिजेन टेस्टमधील 9 अहवालांचा समावेश आहे. निगेटिव्ह अहवालांमध्ये प्रयोगशाळेतील 233 तर रॅपिड टेस्टमधील 85 अहवालांचा समावेश आहे.
पॉझिटिव्ह आलेले अहवाल
बुलडाणा शहर : 19, बुलडाणा तालुका : येळगाव 1, सिंदखेड मातला 1, नांद्राकोळी 1, चिखली शहर : 1, चिखली तालुका : खैरव 1, गांगलगाव 1, चंदनपूर 3, अंत्री खेडेकर 2, मोताळा तालुका : पोफळी 3, देऊळगाव राजा तालुका : सिनगाव जहागीर 4, देऊळगाव राजा शहर : 4, खामगाव शहर : 12, खामगाव तालुका : टेंभुर्णा 1, सुटाळा 1, घाटपुरी 2, किन्ही महादेव 1, मेहकर शहर : 7, शेगाव शहर : 3, लोणार शहर : 1, लोणार तालुका : सिंधी 1
44 रुग्णांनी केली कोरोनावर मात
आज 44 रुग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुटी देण्यात आली आहे. विविध तालुक्यांतील कोविड केअर सेंटरनुसार सुटी देण्यात आलेले रुग्ण असे ः बुलडाणा : अपंग विद्यालय 1, स्त्री रूग्णालय 5, शेगाव : 5, खामगाव : 15, लोणार : 4, देऊळगाव राजा : 3, जळगाव जामोद : 6, मोताळा : 2, चिखली : 3
365 कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार सुरू
आजपर्यंत 97308 रिपोर्ट निगेटिव्ह प्राप्त झाले आहेत. त्याचप्रमाणे आजपर्यंत 12857 कोरोनाबाधित रुग्ण कोरोना निगेटिव्ह असल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुटी देण्यात आली आहे. तसेच 556 स्वॅब नमुने कोविड चाचणीसाठी घेण्यात आले आहेत. आजपर्यंत एकूण निगेटिव्ह अहवाल 97308 आहेत. जिल्ह्यात आजअखेर एकूण 13381 कोरोनाबाधित रुग्ण असून, जिल्ह्यात सध्या रुग्णालयात 365 कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तसेच आजपर्यंत 159 कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकार्यांनी दिली आहे.