पहिल्याच दिवशी ‘ब्रेकिंग द चेन’चे 891 ने पॉझिटिव्ह ‘स्वागत’!; ऑल टाइम रेकॉर्डसह 367, दोघांचे बळी!!

बुलडाणा (विशेष प्रतिनिधी ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा)ः राज्य शासनाच्या धर्तीवर जिल्ह्यातही ब्रेकिंग द चेन अर्थात कडक निर्बंध लागू करण्याच्या पहिल्याच दिवशी तब्बल नऊशेच्या घरात (891) कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले! जिद्दबाज कोविडने असे जंगी स्वागत करून जिल्हा प्रशासनाला खडे आव्हानच दिल्याचे मानले जात आहे. यातच बुलडाणा तालुक्यात आजवरचे सर्व विक्रम तोडून 361 चा आकडा गाठल्याने प्रशासन …
 

बुलडाणा (विशेष प्रतिनिधी ः बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा)ः राज्य शासनाच्या धर्तीवर जिल्ह्यातही ब्रेकिंग द चेन अर्थात कडक निर्बंध लागू करण्याच्या पहिल्याच दिवशी तब्बल नऊशेच्या घरात (891) कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले! जिद्दबाज कोविडने असे जंगी स्वागत करून जिल्हा प्रशासनाला खडे आव्हानच दिल्याचे मानले जात आहे. यातच बुलडाणा तालुक्यात आजवरचे सर्व विक्रम तोडून 361 चा आकडा गाठल्याने प्रशासन व आरोग्य यंत्रणासह तालुकावासी हादरल्याचे चित्र आहे.

जिल्हाधिकाऱ्यांनी 5 एप्रिलच्या मध्यरात्रीपासून ते 30 एप्रिलपर्यंत कडक निर्बंध जारी केले. दिवसा जमावबंदी तर रात्री संचारबंदी लागू केली. तसेच अत्यावश्यक वगळता सर्व दुकाने बंद ठेवण्याचे आदेश बजावले. मात्र यामुळे न घाबरता कोरोनाने तब्बल 891 रुग्णांसह या आदेशाचा निषेध केलाय! अनेक आठवड्यांपासून जिल्ह्यात आघाडीवर असलेल्या बुलडाणा तालुक्यात रेकॉर्डब्रेक 367 रुग्णांची नोंद झाली. तालुक्याचा जवळचा सवंगडी खामगाव( 46 रुग्ण) आज काहीसा माघारला. त्याऐवजी शतक हुकलेल्या चिखली तालुक्याने 95  पॉझिटिव्हपर्यंत मुसंडी मारली! शेगाव 59, मेहकर 50, लोणार 44, सिंदखेडराजा 43 हे तालुके अर्धशतकाच्या आसपास रेंगाळत राहिले. जळगाव जामोद 37, नांदुरा 38, देऊळगाव राजा 37, मोताळा 24 हे तालुके किमान आज नियंत्रणात आहेत. पण उद्याचा भरवसा नाय! संग्रामपूरमध्ये 10 पेशंट निघाले ही पण बातमी ठरते.

नमुने व चाचणीचा वेग वाढला

दरम्यान मंदावलेल्‍या स्वॅब नमुने संकलन व चाचण्यांचा वेग वाढल्याचे दिसून आले. 6242 नमुने संकलन, 6057 अहवाल प्राप्त यावरून ही बाब स्पष्ट होते.  पॉझिटिव्हीचा दरही 15 टक्केच्या खाली आलाय, मात्र 891 पॉझिटिव्हच्या मोठ्या आकड्याखाली हे तांत्रिक दिलासे दबून गेलेत.