नव्या वर्षाच्या पहिली दिवशी 62 नवे कोरोनाबाधित आढळले; मासरूळच्या महिलेचा मृत्यू
बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः जिल्ह्यात आज, 1 जानेवारीला 62 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले असून, मासरूळच्या (ता. बुलडाणा) 60 वर्षीय महिलेचा उपचाराददरम्यान झाला आहे. 37 रुग्णांनी कोरेानावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी मिळाली आहे. प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविलेल्या व रॅपिड अँटिजेन टेस्ट किटद्वारे तपासलेल्या अहवालांपैकी एकूण 636 अहवाल प्राप्त झाले आहेत. यापैकी 574 अहवाल कोरोना निगेटिव्ह असून, 62 अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त आले आहे. प्राप्त पॉझिटिव्ह अहवालांमध्ये प्रयोगशाळेतील 60 रॅपीड अँटिजेन टेस्टमधील 2 अहवालांचा समावेश आहे. निगेटिव्ह अहवालांमध्ये प्रयोगशाळेतील 497 तर रॅपिड टेस्टमधील 77 अहवालांचा समावेश आहे.
पॉझिटिव्ह आलेले अहवाल
शेगाव शहर : 7, बुलडाणा शहर : 14, बुलडाणा तालुका : बिंरसिंगपूर 1, नांदुरा तालुका : शेंबा 1, शेलगाव मुकूंद 4, तारखेड 1, रसूलपुर 1, खामगाव शहर : 13, खामगाव तालुका : आवार 1, पारखेड 1, चिखली शहर : 3, चिखली तालुका : धोडप 1, देऊळगाव राजा शहर : 2, जळगाव जामोद तालुका : सुनगाव 2, जळगाव जामोद शहर : 3, मेहकर शहर : 1, सिंदखेड राजा तालुका : दुसरबीड 1, सावखेड तेजन 2, मलकापूर शहर : 2
37 रुग्ण झाले बरे…
आज 37 रुग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुटी देण्यात आली आहे. विविध तालुक्यांतील कोविड केअर सेंटरनुसार सुटी देण्यात आलेले रुग्ण असे ः खामगाव : 7, सिंदखेड राजा : 1, चिखली :3, बुलडाणा : आयुर्वेद महाविद्यालय 1, स्त्री रुग्णालय 4, शेगाव : 12, मलकापूर : 4, नांदुरा : 1, लोणार : 1, देऊळगाव राजा : 3
521 कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार सुरू
आजपर्यंत 89803 रिपोर्ट निगेटिव्ह प्राप्त झाले आहेत. त्याचप्रमाणे आजपर्यंत 12177 कोरोनाबाधित रुग्ण कोरोना निगेटिव्ह असल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुटी देण्यात आली आहे. तसेच 1809 स्वॅब नमुने कोविड चाचणीसाठी घेण्यात आले आहेत. जिल्ह्यात आज अखेर एकूण 12580 कोरोनाबाधित रुग्ण असून, जिल्ह्यात सध्या रुग्णालयात 251 कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तसेच आजपर्यंत 152 कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी यांनी दिली आहे.