तळणीच्या महिलेचा कोरोनामुळे मृत्यू; बळींचा आकडा 170 वर जिल्ह्यात 44 नव्या कोरोनाबाधितांची भर
बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः जिल्ह्यात कोरोनाबळींचा आकडा 170 वर गेला आहे. आज, 2 फेब्रुवारीला तळणी (ता. मोताळा) येथील 90 वर्षीय महिलेचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याचे समोर आले. दरम्यान, दिवसभरात 44 नवे बाधित आढळले असून, 71 रुग्णांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला.
प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविलेल्या व रॅपिड अँटिजेन टेस्ट किटद्वारे तपासलेल्या अहवालांपैकी एकूण 423 अहवाल प्राप्त झाले आहेत. यापैकी 379 अहवाल कोरोना निगेटिव्ह असून 44 अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त आले आहेत. प्राप्त पॉझिटिव्ह अहवालांमध्ये प्रयोगशाळेतील 32 व रॅपीड अँटिजेन टेस्टमधील 12 अहवालांचा समावेश आहे. निगेटिव्ह अहवालामध्ये प्रयोगशाळेतील 274 तर रॅपिड टेस्टमधील 105 अहवालांचा समावेश आहे.
पॉझिटिव्ह आलेले अहवाल
बुलडाणा शहर ः 10, बुलडाणा तालुका : शिरपूर 1, सिंदखेड 1, संग्रामपूर तालुका : उकळी 1, सिंदखेड राजा तालुका : साखरखेर्डा 1, चिखली शहर : 4, चिखली तालुका : केळवद 5, मालगणी 1, अंचरवाडी 1, अंत्री खेडेकर 1, रानअंत्री 1, देऊळगाव राजा शहर : 8, लोणार शहर : 2, जळगाव जामोद शहर : 1, नांदुरा तालुका : खुमगाव 1, मलकापूर तालुका : दुधलगाव 1, मोताळा तालुका : पिंप्री गवळी 1, शेलगाव बाजार 1, मूळ पत्ता कोनड जि. जालना 1, भुसावळ जि. जळगाव येथील 1 अशाप्रकारे जिल्ह्यात 44 रुग्ण आढळले आहे.
71 रुग्णांनी केली कोरोनावर मात
आज 71 रुग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुटी देण्यात आली आहे. विविध तालुक्यांतील कोविड केअर सेंटरनुसार सुटी देण्यात आलेले रुग्ण असे ः देऊळगाव राजा : 16, लोणार : 2, बुलडाणा : अपंग विद्यालय 16, स्त्री रुग्णालय 2, खामगाव : 1, शेगाव : 8, चिखली : 8, सिंदखेड राजा : 3, मेहकर : 11, संग्रामपूर : 1, नांदुरा : 2, जळगाव जामोद : 1.
332 कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार सुरू
आजपर्यंत 110204 रिपोर्ट निगेटिव्ह प्राप्त झाले आहेत. त्याचप्रमाणे आजपर्यंत 13554 कोरोनाबाधित रुग्ण कोरोना निगेटिव्ह असल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुटी देण्यात आली आहे. तसेच 929 स्वॅब नमुने कोविड चाचणीसाठी घेण्यात आले आहेत. जिल्ह्यात आज अखेर एकूण 14056 कोरोनाबाधित रुग्ण असून, सध्या रुग्णालयात 332 कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तसेच आजपर्यंत 170 कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी यांनी दिली आहे.