जिल्ह्यात नव्या 61 कोरोनाबाधितांची भर; 47 रुग्णांना डिस्चार्ज
बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः जिल्ह्यात आज, 6 फेब्रुवारीला 61 नव्या कोरोनाबाधितांची भर पडली, तर 47 रुग्ण बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला.
प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविलेल्या व रॅपिड अँटिजेन टेस्ट किटद्वारे तपासलेल्या अहवालांपैकी एकूण 677 अहवाल प्राप्त झाले आहेत. यापैकी 616 अहवाल कोरोना निगेटिव्ह असून 61 अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त आले आहेत. प्राप्त पॉझिटिव्ह अहवालामध्ये प्रयोगशाळेतील 58 व रॅपीड टेस्टमधील 3 अहवालांचा समावेश आहे. निगेटिव्ह अहवालामध्ये प्रयोगशाळेतून 465 तर रॅपिड टेस्टमधील 151 अहवालांचा समावेश आहे.
पॉझिटिव्ह आलेले अहवाल
मोताळा शहर : 2, सिंदखेड राजा तालुका : साखरखेर्डा 4, शेंदुर्जन 1, सिंदखेड राजा शहर : 1, बुलडाणा तालुका : सिंदखेड मातला 1, गिरडा 1, म्हसला 1, बुलडाणा शहर : 11, नांदुरा शहर : 1, नांदुरा तालुका : पोटळी 1, खैरा 1, चिखली शहर : 6, चिखली तालुका : केळवद 3, मालगणी 1, भालगाव 1, इसोली 1, धोत्रा भनगोजी 1, देऊळगाव राजा शहर : 7, देऊळगाव राजा तालुका : सिनगाव जहागीर 1, मेहकर तालुका : बोथा 1, शेगाव शहर : 1, शेगाव तालुका : सांगवा 1, पहुरपुर्णा 2, संग्रामपूर तालुका : सोनाळा 1, खामगाव तालुका : पळशी 1, पिंप्री देशमुख 1, खामगाव शहर : 4, मलकापूर शहर : 1, मलकापूर तालुका : उमाळी 1, मूळ पत्ता औरंगाबाद येथील 1 संशयीत व्यक्ती पॉझिटिव्ह आल्या आहेत.
47 रुग्णांनी केली कोरोनावर मात
आज 47 रुग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुटी देण्यात आली आहे. कोविड केअर सेंटरनुसार सुटी देण्यात आलेले रुग्ण असे ः चिखली : 3, देऊळगाव राजा : 1, खामगाव : 5, बुलडाणा : स्त्री रुग्णालय 5, अपंग विद्यालय 8, नांदुरा : 3, शेगाव : 9, जळगाव जामोद : 2, मेहकर : 4, सिंदखेड राजा : 1.
367 कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार सुरू
आजपर्यंत 112155 रिपोर्ट निगेटिव्ह प्राप्त झाले आहेत. त्याचप्रमाणे आजपर्यंत 13736 कोरोनाबाधित रुग्ण कोरोना निगेटिव्ह असल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुटी देण्यात आली आहे. आज रोजी 908 नमुने अहवालाच्या प्रतीक्षेत आहेत. जिल्ह्यात आजअखेर एकूण 14274 कोरोनाबाधित रूग्ण असून सध्या रुग्णालयात 367 कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तसेच आजपर्यंत 171 कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी यांनी दिली आहे.