जिल्ह्यात आढळले 32 नवे कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः जिल्ह्यात आज, 22 जानेवारीला 32 नवे कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण समोर आले. 28 रुग्णांनी कोेरोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला.प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविलेल्या व रॅपिड अँटिजेन टेस्ट किटद्वारे तपासलेल्या अहवालांपैकी एकूण 493 अहवाल प्राप्त झाले आहेत. यापैकी 461 अहवाल कोरोना निगेटिव्ह असून 32 अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त आले आहेत. प्राप्त पॉझिटिव्ह …
 

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः जिल्ह्यात आज, 22 जानेवारीला 32 नवे कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण समोर आले. 28 रुग्णांनी कोेरोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला.
प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविलेल्या व रॅपिड अँटिजेन टेस्ट किटद्वारे तपासलेल्या अहवालांपैकी एकूण 493 अहवाल प्राप्त झाले आहेत. यापैकी 461 अहवाल कोरोना निगेटिव्ह असून 32 अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त आले आहेत. प्राप्त पॉझिटिव्ह अहवालांमध्ये प्रयोगशाळेतील 25 व रॅपीड अँटीजेन टेस्टमधील 7 अहवालांचा समावेश आहे. निगेटिव्ह अहवालांमध्ये प्रयोगशाळेतील 319 तर रॅपिड टेस्टमधील 142 अहवालांचा समावेश आहे.
पॉझिटिव्ह आलेले अहवाल
बुलडाणा शहर ः 5, बुलडाणा तालुका : चांडोळ 1, जनुना 1, चिखली तालुका : बेराळा 1, चिखली शहर : 1, लोणार तालुका : खुरमपूर 4, मोताळा तालुका : तळणी 1, मेहकर शहर : 2, मेहकर तालुका : वरवंड 1, खामगाव तालुका : पळशी 1, शेगाव शहर : 9, शेगाव तालुका : वरखेड 1, देऊळगाव राजा शहर : 2, सिंदखेड राजा तालुका : ताडशिवणी 1, मलकापूर पांग्रा 1
28 रुग्णांनी केली कोरोनावर मात
आज 28 रुग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुटी देण्यात आली आहे. विविध तालुक्यांतील कोविड केअर सेंटरनुसार सुटी देण्यात आलेले रुग्ण असे ः सिंदखेड राजा : 2, खामगाव : 5, लोणार : 2, जळगाव जामोद : 2, मलकापूर : 8, चिखली : 1, मोताळा : 1, शेगाव : 7.
360 कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार सुरू
आजपर्यंत 99181 रिपोर्ट निगेटिव्ह प्राप्त झाले आहेत. त्याचप्रमाणे आजपर्यंत 13016 कोरोनाबाधित रुग्ण कोरोना निगेटिव्ह असल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुटी देण्यात आली आहे. तसेच 1713 स्वॅब नमुने कोविड चाचणीसाठी घेण्यात आले आहेत. जिल्ह्यात आजअखेर एकूण 13539 कोरोनाबाधित रुग्ण असून, जिल्ह्यात सध्या रुग्णालयात 360 कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तसेच आजपर्यंत 163 कोरोनाबाधीतांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी यांनी दिली आहे.