कोरोबाधितांचा आकडा कमी होईना… आज 62 नवे रुग्ण!; 71 जणांना डिस्चार्ज
बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः कोरोनाचा समूळ नायनाट कधी होईल आणि जिल्हा मोकळा श्वास घेईल देवास ठावूक. जिल्ह्यात आज, 13 जानेवारीलाही 62 नवे कोरोनाबाधित समोर आले आहेत. दिवसभरात 71 रुग्ण बरे झाल्याने त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला.
प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविलेल्या व रॅपिड अँटिजेन टेस्ट किटद्वारे तपासलेल्या अहवालांपैकी एकूण 378 अहवाल प्राप्त झाले आहेत. यापैकी 316 अहवाल कोरोना निगेटिव्ह असून, 62 अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त आले आहेत. प्राप्त पॉझिटिव्ह अहवालांमध्ये प्रयोगशाळेतील 56 व रॅपीड टेस्टमधील 6 अहवालांचा समावेश आहे. निगेटिव्ह अहवालांमध्ये प्रयोगशाळेतील 181 तर रॅपिड टेस्टमधील 135 अहवालांचा समावेश आहे.
पॉझिटिव्ह आलेले अहवाल
बुलडाणा शहर ः 17, बुलडाणा तालुका ः सातगाव म्हसला 1, चिखली शहर : 4, चिखली तालुका : अमडापूर 1, सावरखेड 1, सोनेवाडी 1, मोताळा शहर : 2, खामगाव शहर : 8, जळगाव जामोद शहर : 6, जळगाव जामोद तालुका : पिंपळगाव काळे 1, लोणार शहर : 3, देऊळगाव राजा शहर : 1, शेगाव शहर : 14, शेगाव तालुका : वरखेड 1, मेहकर शहर : 1
71 रुग्णांची कोरोनावर मात
आज 71 रुग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुटी देण्यात आली आहे. कोविड केअर सेंटरनुसार सुटी देण्यात आलेले रुग्ण असे ः चिखली : 12, खामगाव :12, बुलडाणा : अपंग विद्यालय 8, स्त्री रुग्णालय 8, शेगाव : 6, मोताळा : 3, सिंदखेड राजा : 6, जळगाव जामोद : 4, देऊळगाव राजा : 7, नांदुरा :1, लोणार :1, मेहकर :3.
320 कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार सुरू
आजपर्यंत 95015 रिपोर्ट निगेटिव्ह प्राप्त झाले आहेत. त्याचप्रमाणे आजपर्यंत 12639 कोरोनाबाधित रुग्ण कोरोना निगेटिव्ह असल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुटी देण्यात आली आहे. तसेच 840 स्वॅब नमुने कोविड चाचणीसाठी घेण्यात आले आहेत. जिल्ह्यात आज अखेर एकूण 13116 कोरोनाबाधित रूग्ण असून, सध्या रुग्णालयात 320 कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार सुरू आहेत. आजपर्यंत 157 कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी दिनेश गिते यांनी दिली आहे.