कोरोनामुळे चिखलीतील वृद्धाचा मृत्यू; एकूण बळींचा आकडा 153 वर, दिवसभरात नवे 54 पॉझिटिव्ह
बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः जिल्ह्यात आज, 5 जानेवारीला कोरोनामुळे उपचारादरम्यान चिखली शहरातील हेडगेवार हॉस्पिटलजवळील रहिवासी 70 वर्षीय पुरुष रुग्णाचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील एकूण बळींचा आकडा 153 वर गेला आहे. दरम्यान, दिवसभरात नवे 54 पॉझिटिव्ह रुग्ण समोर आले आहेत.
प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविलेल्या व रॅपिड अँटिजेन टेस्ट किटद्वारे तपासलेल्या अहवालांपैकी एकूण 321 अहवाल प्राप्त झाले आहेत. यापैकी 267 अहवाल कोरोना निगेटिव्ह असून, 54 अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त आले आहेत. प्राप्त पॉझिटिव्ह अहवालांमध्ये प्रयोगशाळेतील 50 रॅपीड अँटीजेन टेस्टमधील 4 अहवालांचा समावेश आहे. निगेटिव्ह अहवालांमध्ये प्रयोगशाळेतील 170 तर रॅपिड टेस्टमधील 97 अहवालांचा समावेश आहे.
पॉझिटिव्ह आलेले अहवाल
खामगाव तालुका : जळका तेली 1, पिंपळगाव राजा 1, सुटाळा 2, बोरी अडगाव 1, नांदुरा तालुका : निमगाव 1, खामगाव शहर : 7, देऊळगाव राजा शहर : 4, चिखली तालुका : वाघोरा 1, नायगाव 1, वाघापूर 1, चिखली शहर : 13, सिंदखेड राजा तालुका : पळसखेड चक्का 1, लोणार शहर : 2, लोणार तालुका : भुमराळा 1, मोताळा शहर : 1, मोताळा तालुका : खरबडी 2, पिंपळगाव देवी 1, बुलडाणा शहर : 6, मेहकर शहर : 2, मेहकर तालुका : जानेफळ 1, जळगाव जामोद शहर : 3
9 रुग्णांनी केली कोरोनावर मात
आज 9 रुग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुटी देण्यात आली आहे. विविध तालुक्यांतील कोविड केअर सेंटरनुसार सुटी देण्यात आलेले रुग्ण असे ः खामगाव : 3, बुलडाणा : अपंग विद्यालय 5, सिंदखेड राजा : 1.
366 कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार सुरू
आजपर्यंत 92055 रिपोर्ट निगेटिव्ह प्राप्त झाले आहेत. त्याचप्रमाणे आजपर्यंत 12260 कोरोनाबाधित रुग्ण कोरोना निगेटिव्ह असल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुटी देण्यात आली आहे. तसेच 672 स्वॅब नमुने कोविड चाचणीसाठी घेण्यात आले आहेत. आजपर्यंत एकूण निगेटिव्ह अहवाल 92055 आहेत. जिल्ह्यात आज अखेर एकूण 12779 कोरोनाबाधित रुग्ण असून जिल्ह्यात सध्या रुग्णालयात 366 कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तसेच आजपर्यंत 153 कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी यांनी दिली आहे.